माटुंग्याच्या सुधारगृहात एका अल्पवयीन मुलाच्या मृत्यूप्रकरणी गुरूवारी आणखी १५ मुलांवर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या पूर्वी दोघांवर हा गुन्हा दाखल होता. सुधारगृहातील मुलांनी मारहाण केल्याने या सुधारगृहात असलेल्या आमिर जमिल खान या १७ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला होता.
 एका चोरीच्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आमिर जमिल खान (१७) या मुलाला माटुंग्याच्या डेव्हिड ससून औद्योगिक सुधारगृहात ठेवण्यात आले होते.