X

कल्याणमधील भाजप नगरसेवकावर बलात्काराचा गुन्हा

अद्याप आरोपींना अटक नाही

कल्याणमधील भाजप नगरसेवक दया गायगकवाड विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २७ वर्षीय तरुणीला लग्नाचे आमीष दाखवून तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप दया गायकवाडांवर आहे. तर या सगळ्यात त्याला मदत केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी अश्विनी धुमाळ व त्यांच्या पतीवरही गुन्हा दाखल झाला आहे.

भाजप नगरसेवक दया गायकवाड यांच्याविरोधात २७ वर्षीय तरुणीने पोलीस आयुक्तांकडे तक्रार अर्ज दिला होता. या अर्जाच्या आधारे पोलिसांनी सोमवारी रात्री उशीरा गुन्हा दाखल केला आहे. दया गायकवाड यांच्याशी माझी सोशल नेटवर्किंग साईटवरुन ओळख झाली होती. दया गायकवाडने पहिले लग्न झाल्याचे लपवले आणि माझ्याशी प्रेमाचे नाटक केले. आपण लग्न करु असे सांगून दया गायकवाडने मला टिटवाळा आणि बदलापूरमध्ये नेले. तिथे गायकवाडने माझ्यावर बलात्कार केला असा आरोप पीडितेने तक्रारीत केला आहे. दया गायकवाडचा फोन त्याच्या पत्नीने उचलल्यानंतर त्याचा बनाव उघड झाला. दया गायकवाडला जाब विचारला असता त्याने पत्नीशी घटस्फोट घेऊन माझ्याशी लग्न करु, अशी सारवासारव केल्याचे पीडितेचे म्हणणे आहे.

दया गायकवाड यांनी पीडितेला धमकावल्याचा आरोपही आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसमधील पदाधिकारी अश्विनी धुमाळ आणि त्यांचे मनोज धुमाळ यांनीदेखील दया गायकवाडला मदत केल्याचा आरोप आहे. मी पोलिसांकडे तक्रार केल्यास खंडणी मागितल्याची उलट तक्रार करु, अशी धमकी दया गायकवाड, अश्विनी धुमाळ आणि मनोज धुमाळ या तिघांनी दिली होती असे पीडितेने तक्रारीत म्हटले आहे. या तिघांना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. मात्र, या प्रकरणामुळे कल्याणमधील राजकीय क्षेत्रात खळबळ माजली आहे.

  • Tags: bjp-corporator, Daya Gaikwad, rape,
  • Outbrain