19 March 2019

News Flash

कल्याण गुन्हे शाखेतील पोलिसाकडून तरुणीचा विनयभंग

पाटील मानपाडा पोलीस वसाहतीत राहतात. याच वसाहतीत एका पोलीस कर्मचाऱ्याची मुलगी आपल्या कुटुंबासह राहते.

(संग्रहित छायाचित्र)

कल्याण गुन्हे शाखेतील पोलीस जितेंद्र पाटील यांनी दारूच्या नशेत मानपाडा पोलीस वसाहतीमधील एका तरुणीचा विनयभंग केला आहे. रविवारी रात्री ही घटना घडली.

पाटील मानपाडा पोलीस वसाहतीत राहतात. याच वसाहतीत एका पोलीस कर्मचाऱ्याची मुलगी आपल्या कुटुंबासह राहते. एकाच वस्तीत राहत असल्याने पाटील व त्या मुलीची ओळख होती. रविवारी रात्री जितेंद्र पाटील दारूच्या नशेत होते. पीडित मुलगी इमारतीच्या गच्चीवर पाण्याचा पाइप गुंडाळण्याचे काम करीत होते. त्या वेळी पाटील तिच्याजवळ गेले आणि तिच्याशी लगट करू लागले. हा प्रकार सहन न झाल्याने पीडित तरुणीच्या कुटुंबीयांनी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

First Published on June 12, 2018 3:21 am

Web Title: kalyan crime branch police molestation of a young woman