कल्याण-डोंबिवली महानगर पालिका क्षेत्रात करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून महानगरपालिका क्षेत्रात ११ मार्च पासून पुढील आदेश होईपर्यंत हॉटस्पॉट क्षेत्राबाहेरील अन्य क्षेत्रांमध्ये सकाळी १० ते रात्री ८ पर्यंत निर्बंध लागू करण्यात आले आहेत. तसेच, सद्यस्थितीमध्ये महापालिका क्षेत्रात करोनाचे रूग्ण वाढत असलेल्या रूग्ण संख्येवर आळा घालण्यासाठी उपाययोजना करणे आवश्यक झाल्याने, या पार्श्वभूमीवर कल्याण-डोंबिवली मनपा आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दर शनिवार आणि रविवारी काही प्रतिबंधात्मक उपाययोजना लागू केल्या आहेत. त्यानुसार कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात अत्यावश्यक सेवा वगळता शनिवारी-रविवारी सर्व दुकाने बंद राहणार आहेत.

अत्यावश्यक सेवा, औषधी दुकानं व वैद्यकीय सेवा, किराणा, दूध व वृत्तपत्रे, पेट्रोलपंप इत्यादी वगळून सर्व प्रकारच्या आस्थापना पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्यात येत आहेत. फेरीवाले, हातगाडी विक्रेते यांना मज्जाव करण्यात आला आहे.

महापालिका क्षेत्रातील भाजीमंडई ५० टक्के क्षमतेने सुरू राहणार आहे. तर, हॉटेल्स, बार, रेस्टॉरंट, पोळीभाजी केंद्र इत्यादी ठिकाणी पार्सल सुविधा सुरू राहणार आहे.