27 May 2020

News Flash

माझ्यातील परिचारिका स्वस्थ बसू देत नाही, रुग्णसेवेची परवानगी द्या; महापौरांची आयुक्तांना विनंती

त्यांनी तसं पत्र आयुक्तांना लिहिलं आहे.

करोनानं हळहळू पाय रोवायला सुरूवात केली आहे. देशात आणि राज्यात दिवसेंदिवस परिस्थिती चिंताजनक होत चालली आहे. या संकटाला भिडण्यासाठी अनेक मदतीचे हात समोर येत आहेत. अनेकजण पुन्हा डॉक्टर बनले आहेत. तर काहींनी परिचारिकेचा पेशा स्वीकारत करोनाग्रस्तांना आधार दिला आहे. कल्याण डोंबिवलीच्याच्या महापौरही पूर्वी परिचारिका म्हणून कार्यरत होत्या. करोनामुळे निर्माण झालेल्या कठीण परिस्थितीत त्यांनी पुन्हा रुग्णसेवा करण्यासाठी महापालिका आयुक्तांकडे परवानगी मागितली आहे.

करोनाच्या संसर्गामुळे देश संकटात आहे. मी महापौर असले तरी माझ्यातील परिचारिका स्वस्थ बसू शकत नाही. त्यामुळे रुग्णसेवा करण्यासाठी मला परवानगी देण्यात यावी, अशी विनंती कल्याण डोंबिवलीच्या महापौर विनीता राणे यांनी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडे केली आहे.

काय म्हणाल्या महापौर राणे?

“राज्यात करोनाचा संसर्ग वाढू नये, यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वेळीच खबरदारी घेऊन कठोर उपाययोजना केल्या आहेत. करोनाचा प्रसार वाढू नये यासाठी सर्वांनीच योगदान देण्याची गरज आहे. मी कल्याण डोंबिवली महापालिकेची महापौर असले, तरी नायर रुग्णालयात ३२ वर्षे परिचारिका म्हणून सेवा केली आहे. त्यामुळे देश संकटात असताना मी स्वस्थ बसू शकत नाही. मी कल्याण डोंबिवली महापालिका रुग्णालयात सेवा देण्यास तयार असून, मला अनुमती मिळावी,” असं महापौर विनीता राणे यांनी आयुक्तांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.

मुंबईतील रुग्ण संख्येत झपाट्यानं वाढ

मुंबईमधील करोनाबाधितांची संख्या ४८ वर पोहोचली असून पूर्व आणि पश्चिम उपनगरांच्या तुलनेत शहर भागात करोनाबाधित रुग्णांची संख्या अधिक आहे. शहरातील करोनाबाधितांची संख्या ३०७ वर पोहोचली असून त्यापैकी २५७ रुग्ण दक्षिण मुंबईतील ग्रॅन्टरोड, भायखळा, वरळी, परळ भागात सापडले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 9, 2020 8:29 am

Web Title: kalyan dombivali mayor vinita rane asked permission to commissioner for nursing job during corona bmh 90
टॅग Coronavirus
Next Stories
1 Coronavirus : बैठय़ा वस्त्यांमध्ये धोक्याची घंटा
2 Coronavirus : दक्षिण मुंबई अतिसंवेदनशील ; आतापर्यंत रुग्णसंख्या अडीचशेवर
3 Coronavirus Test : ‘अ‍ॅण्टिबॉडी चाचणी’च्या नावाखाली लुटीचा डाव?
Just Now!
X