News Flash

कल्याण, डोंबिवलीचा पाणी पुरवठा रात्री उशिरापर्यंत पूर्ववत होण्याची शक्यता

मोहने आणि मोईली पंपिंग स्टेशनवर दुरुस्तीचे काम सुरू

प्रतिनिधिक छायाचित्र

मुसळधार पावसामुळे एकीकडे कल्याण डोंबिवली जलमय झालेली असतांना दुसरीकडे पाणी पुरवठा बंद झाल्याने शहरात पाणीबाणी निर्माण झाली आहे. मात्र, मोहने आणि मोईली या दोन्ही पंपिंग स्टेशनवर युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम सुरू आहे. त्यामळे कल्याणामधील पाणी पुरवठा पूर्ववत होण्यासाठी संध्याकाळ तर डोंबिवली आणि २७ गावातील पाणी पुरवठा सुरु होण्यासाठी रात्र होईल, अशी माहिती महापालिकेच्या संबंधित विभागातर्फे देण्यात आली आहे.

मुसळधार पावसामुळे मोईली पंपिंग स्टेशन पाण्याखाली गेले आहे. तर, याच कारणास्तव मोहने पंपिंग स्टेशनचा वीजपुरवठा खंडित झाला आहे. परंतु, या दोन्ही ठिकाणी महापालिका आणि महावितरणकडून युद्धपातळीवर काम सुरू असल्याचेही पाणी पुरवठा विभागातर्फे सांगण्यात आले आहे. त्यामुळे आज रात्रीपर्यंत कल्याण आणि डोंबिवली शहरांचा पाणी पुरवठा सुरळीत होईल अशी शक्यता असल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान पाणी पुरवठा बंद असल्याने कल्याण आणि डोंबिवलीत लोकांची प्रचंड गैरसोय होत असून पिण्याच्या पाण्यासाठी बाटलीबंद पाण्याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात असल्याचे दिसत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 28, 2019 3:45 pm

Web Title: kalyan dombivali water supply may be start till late at night msr 87
Next Stories
1 ‘बॉम्बे है’ ऐवजी ‘बॉम्ब है’ ऐकले आणि मुंबई विमानतळावर एकच गोंधळ उडाला
2 मुंबई : मध्य-हार्बरच्या प्रवाशांना दिलासा, मेगा ब्लॉक रद्द
3 प्रवाशांचे हाल, मुंबई लोकलच्या तीनही मार्गावर मेगा ब्लॉक
Just Now!
X