नागोठणे येथे दिवा-सावंतवाडी गाडीला झालेल्या अपघातामुळे नागोठणे भागात अडकून पडलेल्या प्रवाशांसाठी कल्याण, डोंबिवलीतील त्यांच्या नातेवाइकांनी खास वाहने पाठवून मदत केली. अडकलेल्या या प्रवाशांना नागोठणे भागात असलेल्या आपल्या नातेवाईक, शेजाऱ्यांच्या ओळखीने या वाहनांच्या साहाय्याने सोडून तेथे राहण्याची व भोजनाची व्यवस्था केली असल्याचे काही नागरिकांनी सांगितले.
कल्याण, डोंबिवलीतील कोकणात जाणारे काही प्रवासी दिवा येथे चढताना गाडीला खूप गर्दी असते म्हणून पनवेल रेल्वे स्थानकात जाऊन गाडी पकडतात. या भागातून अनेक प्रवासी दिवा, पनवेल येथून सावंतवाडी गाडीने कोकणात जात होते. गाडीला अपघात  झाल्याचे सकाळी कळताच कल्याण, डोंबिवलीतील या प्रवाशांच्या नातेवाइकांनी खास वाहने पाठवून अडकलेल्या प्रवाशांची व्यवस्था केली.  अनेक प्रवाशांना शेजारी राहत असलेल्या नातेवाइकांच्या घरी जाऊन राहण्यास सांगण्यात येत होते. त्यांच्या भोजनाची व्यवस्था करण्यात येत होती. या मार्गावरील वाहतूक केव्हा सुरळीत होईल याची शाश्वती नसल्याने अनेक प्रवासी कल्याण, डोंबिवलीकडे जामानिमा घेऊन परतत होते.

मदत व बचाव कार्य युद्धपातळीवर  

नागोठणेजवळ घडलेल्या दिवा-सावंतवाडी पॅसेंजर रेल्वे दुर्घटनेतील अपघातग्रस्तांसाठी प्रशासनामार्फत मदत व बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू असून जखमींवर रोहा, अलिबाग, नागोठणे येथे तातडीने उपचार सुरू करण्यात आले आहेत.

पालकमंत्री सुनील तटकरे, गृहमंत्री आर.आर.पाटील, नगरविकास राज्यमंत्री उदय सामंत आदींनी घटनास्थळी जाऊन बचाव कार्याचा आढावा घेतला आहे.

या अपघातातील मृत व्यक्ती तसेच जखमींना राज्य सरकारकडून आíथक मदत मिळवून देण्यासाठी आपण मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची उद्या भेट घेणार असल्याचे तटकरे यांनी सांगितले.

राज्याचे गृहमंत्री आर.आर.पाटील, नगरविकास राज्यमंत्री उदय सामंत यांनीही घटनास्थळी भेट देऊन दुर्घटनेची पाहणी केली, तसेच सुरू असलेल्या मदत व बचाव कार्याचीही माहिती घेतली. दुर्घटनेतील जखमींची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली.

घटनास्थळावर विशेष पोलीस महानिरीक्षक ए.के. सिंग, पोलीस अधीक्षक अंकुश िशदे, अतिरिक्तपोलीस अधीक्षक राजा पवार, अप्पर जिल्हाधिकारी प्रवीण िशदे, उपविभागीय महसूल अधिकारी सुभाष भागडे यांच्यासह रेल्वे, महसूल व पोलीस प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी असून त्यांनी मदत व बचाव कार्याला गती दिली आहे.