News Flash

कल्याण-डोंबिवली दरम्यान रेल्वे सेवा आज चार तास बंद

कल्याण ते डोंबिवली दरम्यानची रेल्वे वाहतूक सकाळी १० ते दुपारी २ च्या दरम्यान बंद राहणार आहे.

 

कल्याण  : नाताळच्या सुट्टीचे निमित्त साधत मध्य रेल्वेने बुधवारी ठाकुर्ली रेल्वे स्थानकातील पादचारी पुलावर गर्डर टाकण्याचे काम करण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी मेगाब्लॉक जाहीर केला आहे.

कल्याण ते डोंबिवली दरम्यानची रेल्वे वाहतूक सकाळी १० ते दुपारी २ च्या दरम्यान बंद राहणार आहे. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी रेल्वेने कल्याण ते कर्जत-कसारा, सीएसएमटी ते डोंबिवली, ठाणे-डोंबिवली दरम्यान २० मिनिटाच्या अंतराने विशेष लोकल सेवा सुरू ठेवली आहे. सुट्टीचा मुहूर्त साधून मुंबई, ठाण्यात फिरायला जाणाऱ्यांसाठी मेगाब्लॉक त्रासदायक ठरण्याची शक्यता आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 25, 2019 2:40 am

Web Title: kalyan dombivli railway service four hour stop akp 94
Next Stories
1 शेतकरी कर्जमुक्ती योजनेला मान्यता
2 मुख्यमंत्री कार्यालयासाठी दोन पत्रकारांची धडपड
3 मुख्यमंत्र्यांचे पंतप्रधानांना स्मरणपत्र
Just Now!
X