News Flash

कल्याण-डोंबिवलीत महिनाभर पाणीकपात

कल्याण डोंबिवली शहराचा पाणीपुरवठा डिसेंबरअखेपर्यंत सोमवारी रात्री १२ ते मंगळवारी रात्री १२ असा २४ तास बंद ठेवण्यात येणार आहे.

| November 16, 2014 02:14 am

कल्याण डोंबिवली शहराचा पाणीपुरवठा डिसेंबरअखेपर्यंत सोमवारी रात्री १२ ते मंगळवारी रात्री १२ असा २४ तास बंद ठेवण्यात येणार आहे. यामुळे नोव्हेंबर व डिसेंबरमध्ये पुरवठा चार वेळा बंद राहील.
मोहिली येथून शहराच्या पाणीपुरवठय़ासाठी पाणी उचलते जाते. हे पाणी बारवे, नेतिवली, टिटवाळा, मोहिली येथील जलशुद्धीकरण केंद्रातून कल्याण, डोंबिवली शहरांना पुरवले जाते. ३१ डिसेंबपर्यंत पाणीबचतीचे नियोजन करण्यासाठी कल्याण डोंबिवली पालिकेचा पाणीपुरवठा १८ नोव्हेंबर, २ डिसेंबर, १६ डिसेंबर आणि ३० डिसेंबर या कालावधीत सोमवारी रात्री बारा ते मंगळवार रात्री बारा या कालावधीत बंद असेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 16, 2014 2:14 am

Web Title: kalyan dombivli to face water cut
टॅग : Kalyan Dombivli
Next Stories
1 काँग्रेस शिष्टमंडळाकडून राज्यपालांकडे दिलगिरी
2 नालासोपाऱ्यात भीषण स्फोट, सात जण जखमी
3 मुख्यमंत्र्यांची ‘स्वच्छता’ मोहीम!
Just Now!
X