05 December 2020

News Flash

लग्नाच्या हॉलमध्ये हाय हिल्स सॅण्डलमुळे आईचा तोल डळमळला, सहा महिन्याच्या मुलाचा मृत्यू

लग्न सोहळा किंवा अन्य कार्यक्रमांमध्ये अनेकदा महिला हाय हिल्सचे सॅण्डल घालून वावरताना दिसतात. हाय हिल्सचे सॅण्डल घातल्यानंतर तोल सावरता येणे आवश्यक असते.

लग्न सोहळा किंवा अन्य कार्यक्रमांमध्ये अनेकदा महिला हाय हिल्सचे सॅण्डल घालून वावरताना दिसतात. हाय हिल्सचे सॅण्डल घातल्यानंतर तोल सावरता येणे आवश्यक असते. काहीवेळा तोल सावरता न आल्यामुळे अपघात घडण्याची शक्यता असते. रविवारी संध्याकाळी कल्याणमध्ये एका विवाहसोहळयात हाय हिल्सच्या सॅण्डलमुळे असाच एक दुर्देवी अपघात घडला. ज्यामध्ये एका सहा महिन्याच्या लहान मुलाचा दुर्देवी मृत्यू झाला.

मोहम्मद शेख असे मृत मुलाचे नाव आहे. लग्नाला आलेल्या फेमिदा शेखने (२३) हाय हिल्सचे सॅण्डल घातले होते व तिचे सहा महिन्यांचे मूल तिच्या अंगावर होते. मुलाला घेऊन चालत असताना हाय हिल्सच्या सॅण्डलमुळे एका टप्प्यावर फेमिदाचा तोल डळमळला व अंगावर असलेला मोहम्मद पहिल्या मजल्यावरील गॅलरीतून खाली पडला. मोहम्मदला लगेचच नजीकच्या रुग्णालयात नेण्यात आले पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

शेख कुटुंब उल्हासनगर धोबीघाट येथे राहायला आहे. रविवारी ते कल्याणच्या रामबाग परिसरातील मातोश्री हॉल येथे नातेवाईकाच्या लग्नासाठी आले होते. लग्न सोहळा आटोपून हे कुटुंब घरी निघालेले असताना हाय हिल्सच्या सॅण्डलमुळे फेमिदा शेखचा तोल गेला व हातात असलेला सहा महिन्यांचा मोहम्मद पहिल्या मजल्यावरील गॅलरीतून खाली पडला. कुटुंबिय लगेचच मोहम्मदला कल्याणच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात घेऊन गेले. तिथे डॉक्टरांनी मोहम्मदला मृत घोषित केले. महात्मा फुले पोलीस स्टेशनमध्ये अपघाती मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरु आहे. मोहम्मदचे वडिल उल्हासनगर येथील दुकानात हेल्परचे काम करतात. त्याची आई फेमिदा गृहिणी आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 7, 2018 1:33 pm

Web Title: kalyan high heels mom lost control boy death
टॅग Kalyan
Next Stories
1 बुलेट ट्रेनविरोधात मनसे आक्रमक, जागेची मोजणी पाडली बंद
2 शिवसेना पालघर लोकसभा पोटनिवडणूक लढणार; उमेदवार ठरला, सुत्रांची माहिती
3 मुंब्रा बाह्य़वळण मार्ग मध्यरात्रीपासून बंद
Just Now!
X