News Flash

सीएसएमटी स्थानकावर लोकलची बंपरला धडक

फलाट क्रमांक तीनवर हा प्रकार घडला आहे

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर लोकलने बंपरला धडक दिली आहे. फलाट क्रमांक तीनवर हा प्रकार घडला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण दिशेकडून आलेली धिमी लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमध्ये फलाट क्रमांक तीनवर आली असता बंपरला धडकली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणताही प्रवासी जखमी झालेला नाही. मोटरमनने आपत्कालीन ब्रेक कार्यान्वित केल्यामुळे मोठी दुर्घटना टळली.

लोकल बंपरला धडकली असल्याची माहिती मिळताच आरपीएफ तसंच रेल्वे अधिकारी घटनास्थळी पोहोचले होते. काही वेळासाठी फलाट क्रमांक तीनवरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. दरम्यान नेमका कशामुळे हा प्रकार घडला याची मध्य रेल्वे चौकशी करणार असून तसा आदेश देण्यात आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 30, 2019 3:05 pm

Web Title: kalyan slow local hit bumper on csmt sgy 87
Next Stories
1 पाच वर्षात एकही प्रश्न नाही, हजेरीतही डिफॉल्टर; अशी आहे भाजपाच्या राम कदम यांची कामगिरी
2 मुंबई – उदयोन्मुख अभिनेत्रीची इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्या
3 आमदारांचे प्रगतीपुस्तक: मुंबईकरांनो जाणून घ्या तुमच्या आमदारांना किती गुण मिळाले
Just Now!
X