कमला मिलमधील आगीप्रकरणी अटकेत असलेल्या युग पाठक, जिगर संघवी, क्रिपेश संघवी आणि अभिजित मानकर यांचा जामीन अर्ज मुंबई हायकोर्टाने गुरुवारी फेटाळला. त्यामुळे या सर्व आरोपींना आणखी काही काळ आता तुरुंगातच राहावे लागणार आहे.

गेल्या वर्षी २९ डिसेंबर रोजी कमला मिलमधील ‘वन अबव्ह’ आणि ‘मोजो बिस्त्रो’ या दोन पबमध्ये भीषण आग लागली होती. या आगीत १४ जणांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी वन अबव्ह आणि मोजो बीस्ट्रोचे मालक युग पाठक, जिगर संघवी, क्रिपेश संघवी, अभिजित मानकर यांना अटक केली होती. सध्या सर्व आरोपी हे आर्थर रोड कारागृहात आहे.

तुरुंगात असलेल्या आरोपींच्यावतीने जामिनासाठी मुंबई हायकोर्टात अर्ज करण्यात आला होता. या जामीन अर्जावर गुरुवारी सुनावणी झाली. हायकोर्टाने या सर्वांचा जामीन अर्ज फेटाळून लावला असून त्यांना आणखी काही काळ तुरुंगातच राहावे लागणार हे स्पष्ट झाले.