03 March 2021

News Flash

कमला मिलच्या मालकाला समन्स

पोलिसांनी मोजोज ब्रीस्टोचे संचालक युग पाठक यांच्याकडेही कसून चौकशी केली.

संग्रहित छायाचित्र

अवैध बांधकामांसह अग्निकांडाचीही चौकशी होणार

कमला मिलचे मालक रमेश गोवानी यांना ना. म. जोशी मार्ग पोलिसांनी समन्स जारी करून चौकशीसाठी बोलावले आहे. ‘एमआरटीपी’ कायद्यान्वये नोंदवण्यात आलेल्या गुन्ह्यांसह अग्निकांडाबाबतही पोलीस त्यांची चौकशी करणार आहेत.

दरम्यान, पोलिसांनी मोजोज ब्रीस्टोचे संचालक युग पाठक यांच्याकडेही कसून चौकशी केली.

२८ डिसेंबरच्या रात्री कमला मिलमधील ‘वन अबव्ह’, ‘मोझोज ब्रीस्टो’ या रेस्टोपबला भीषण आग लागून त्यात १४ जणांचा मृत्यू झाला होता. या जीवितहानीला जबाबदार धरून पोलिसांनी ‘वन अबव्ह’च्या तीन संचालकांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवला. मात्र हे संचालक अद्यापही फरार असून यात क्रिपेश संघवी, जिगर संघवी आणि अभिजीत मानकर यांचा समावेश आहे.

आगीचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. त्यासाठी अग्निशमन दल चौकशी करते आहे. मात्र ना. म. जोशी मार्ग पोलिसांनी कमला मिलमधील इमारतीच्या गच्चीवर असलेल्या ‘वन अबव्ह’, ‘मोजोज ब्रीस्टो’ या रेस्टोपबचे आरखडा चित्र तयार केले आहे. दोन्ही आस्थापनांमधील रचना, स्वयंपाकगृह, ग्राहकांची आसनव्यवस्था, स्वच्छतागृह, प्रवेशद्वार या आणि अशा सर्वच बारीकसारीक गोष्टी या नकाशात आहेत. त्याआधारे पोलीस जखमी किंवा प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांकडून २९ डिसेंबरच्या रात्री घडलेल्या प्रत्येक घटना, घडामोडींची नेमकी माहिती घेण्याचा प्रयत्न करीत आहेत.

‘मोजोज’चे संचालक आणि पुण्याचे माजी पोलीस आयुक्त के. के. पाठक यांचे चिरंजीव युग पाठक यांना चौकशीसाठी बोलावले होत, अशी माहिती परिमंडळ तीनचे उपायुक्त वीरेंद्र मिश्रा यांनी ‘लोकसत्ता’ला दिली.

आरोपींचेच सीबीआय चौकशीसाठी पत्र?

फरार संचालकांनी वकिलामार्फत या प्रकरणाचा तपास ‘सीबीआय’कडे सोपवावा, अशी मागणी करणारे पत्र राज्य सरकारसह पोलीस अधिकाऱ्यांना दिले आहे. ना. म. जोशी मार्ग पोलिसांवर आणि त्यांच्याकडून सुरू असलेल्या तपासावर विश्वास नसल्याचा उल्लेख पत्रात आहे, असे समजते. हे पत्र म्हणजे अटक टाळण्याचीधडपड असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 3, 2018 3:25 am

Web Title: kamla mill fire summons to kamla mill owner
Next Stories
1 शिक्षकांवर ‘दानशूर’ शोधण्याचेही लोढणे
2 गाथा शस्त्रांची : आदिम शस्त्रे
3 पूर्व उपनगरांत भडका!
Just Now!
X