बालकवितांच्या संकल्पनेवर उद्यानाची रचना;  सर्वसामान्यांच्या विसाव्यासाठीही आधुनिक व्यवस्था

‘ये रे, ये रे, पावसा’, ‘बा बा ब्लॅक शीप’, ‘मछली जल की रानी है’ यांसारख्या बालकवितांच्या संकल्पनेवर आधारित करण्यात आलेली रचना, मोकळय़ा जागा, आकर्षक पायवाटा, विविध संकल्पनांवर आधारित सज्जे, भुरळ पाडणारी रोषणाई आणि म्हातारीच्या बुटाचा नवा साज अशा नवीन अवतारात दक्षिण मुंबईतील प्रसिद्ध कमला नेहरू उद्यान (हँगिंग गार्डन) मुंबईकरांसाठी आज, गुरुवारपासून खुले होणार आहे. बच्चेकंपनीला आकर्षित करण्याबरोबरच सर्वसामान्य मुंबईकरांना विसावा देण्यासाठी नावीन्यपूर्ण जागांची निर्मिती उद्यानात करण्यात आली आहे.

traffic block, Mumbai-Pune Expressway,
मुंबई – पुणे द्रुतगती मार्गावर उद्या दोन तासांचा वाहतूक ब्लॉक
Mega block on Central Harbour and Trans Harbour route
मुंबई : मध्य, हार्बर, ट्रान्स हार्बर मार्गावर मेगाब्लॉक
rail line to Karjat
कर्जतला जाण्यासाठी आणखी एक रेल्वे मार्ग, पनवेल – कर्जत रेल्वे मार्ग डिसेंबर २०२५ पूर्ण करण्याचे उद्दिष्ट्य
Pune, delivery boy Arrested, Stealing Electronics, laptop, mobile, warje, sinhagad road, Student, Flat, Valuables, Rs 4 Lakh, smart watch, Seized, crime news, police, marathi news,
पुणे : विद्यार्थ्यांचे लॅपटॉप चोरणारा डिलिव्हरी बॉय अटकेत; नऊ लॅपटॉप, मोबाइल, दुचाकी जप्त

‘म्हातारीचा बूट’ ही वास्तू कमला नेहरू उद्यानाचे विशेष आकर्षण असल्यामुळे याठिकाणी लहान मुलांची वर्दळ मोठया संख्येने असते. त्यामुळे त्यांना केंद्रस्थानी ठेवून उद्यानाच्या नूतनीकरणाचे काम महापालिकेच्या अंतर्गत गेल्या जानेवारी महिन्यापासून सुरू होते. आता वर्षभराच्या अवकाशानंतर लहान मुलांच्या स्वागतासाठी उद्यान तयार झाले आहे. मराठी, हिंदी आणि इंग्रजी कवितांच्या संकल्पनेवर आधारित उद्यानाची रचना करण्यात आली आहे.  उद्यानाला मोठय़ा संख्येने भेट देणाऱ्या लोकांचा विचार करून प्राथमिक स्तरावर मोकळी जागा आणि विविध आसनव्यवस्थेच्या सुविधा तयार करण्यात आल्या आहेत. सिमेंटीकरण टाळून ‘रॅम्प वॉक वे’ प्रकारच्या वाटा करून त्याबाजूने नियोजनबद्ध वृक्षारोपन करण्यात आले आहे. उद्यानातील जैवविविधतेच्या दृष्टीने फुलपाखरे आणि पक्ष्यांना आकर्षित करण्याबरोबरच वाऱ्याची दिशा लक्षात घेऊन सुवासिक फुलझाडांची रचना करण्यात आली आहे. वृक्षांची ओळख करून देण्यासाठी त्या-त्या वृक्षाच्या पानाच्या आकाराचे नामफलक तयार करून त्यावर लावण्यात आले आहेत. याशिवाय रात्रीच्या प्रकाशनिर्मितीमुळे पक्ष्यांना होणारा त्रास लक्षात घेता ‘ग्राऊंड’ आणि ‘स्पॉट’ पद्धतीच्या रोषणाईची मांडणी केली गेली आहे.

लहान मुलांच्या दृष्टीने खेळण्याच्या साहित्यांची रचना पूर्वीसारखी ठेवून त्यांना कवितांची जोड देण्यात आली आहे. उद्यानात अस्तिवात असणाऱ्या अ‍ॅम्फीथिएटरला इंद्रधनुषी रंगाचा साज चढवून त्याला ‘बा बा ब्लॅक शिप’ या कवितेच्या संकल्पनेची जोड देण्यात आली आहे. तसेच पूर्वी उद्यानाच्या मध्यभागी असणारे कारंजे काढून ‘मछली जली की राणी है’ या कवितेच्या संकल्पनेवर आधारित माश्यांसाठी मोठी टाकी बांधण्यात आली आहे. त्यासभोवती ‘ये रे ये रे पावसा’ या कवितेच्या संकल्पनेवरून कारज्यांची निर्मिती करण्यात आली आहे. संरक्षण जाळींना मण्यांच्या पाटीची रचना करून पायवाटांवर काचपाणी खेळाची रचना साकारण्यात आली आहे. याशिवाय जंगल बुक, माकड-बगळ्याची गोष्ट यासांरख्या गोष्टींची मांडणी देखील उद्यानात करण्यात आली आहे.

आकर्षक जागा

* होकायंत्राच्या संकल्पनेवर आधारित गोलाकार ‘मरिनस कम्पस व्ह्य़ू पॉईंट’ ची निर्मिती. येथून नेव्ही नगरच्या शेवटच्या टोकाचे दर्शन होते.

* ‘एको गजिबो व्ह्य़ू गॅलरी’ची नव्याने निर्मिती करण्यात आली आहे. याठिकाणी सापशिडीच्या फास्यांप्रमाणे बैठक व्यवस्थेची निर्मिती करण्यात आली आहे.

* उद्यानाला भेट देणाऱ्यांना ‘मरीन ड्राइव्ह’चे दर्शन घडविण्यासाठी प्रशस्त अशा दोन बैठकीच्या जागांची निर्मिती.