03 August 2020

News Flash

कांदिवलीत पेट्रोल पंपावर सिलेंडरचा स्फोट, तीन जण जखमी

कांदिवली पश्चिमेला मिलाप पेट्रोल पंपावर शनिवारी सकाळी रिक्षामध्ये गॅस भरताना स्फोट झाला. या दुर्घटनेत दोन रिक्षा चालक जखमी झाले.

कांदिवली पश्चिमेला मिलाप पेट्रोल पंपावर शनिवारी सकाळी रिक्षामध्ये गॅस भरताना सिलेंडरचा स्फोट झाला. या दुर्घटनेत दोन रिक्षा चालक आणि एक नागरिक  जखमी झाला असून त्यांना तुंगा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

रिक्षामध्ये गॅस ओव्हरलोड झाल्यामुळे हा स्फोट झाला. दोघांची हालत नाजूक असल्याची माहिती मिळत आहे. पोलीस आणि अग्निशमन दलाच्या गाडया घटनास्थळी रवाना झाल्या आहेत. या स्फोटात रिक्षाचा चक्काचूर झाला आहे. २० मिनिटे रिक्षा चालक एकाच जागेवर पडून होता. अनिल शिवराम मोरे (५७) , सोहेल कमाल अहमद शेख (५७), शैलेश कृपाशंकर तिवारी (२५) हे तिघे जखमी झाले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 20, 2018 10:06 am

Web Title: kandivali milap petrol pump blast in rickshaw
Next Stories
1 …आणि पंतप्रधानांशी संवाद झालाच नाही!
2 जागतिक चंद्रमहोत्सव दिन आज
3 रिक्षाप्रवास तापदायकच!
Just Now!
X