21 January 2021

News Flash

कंगनाचं ड्रग्जसेवन? या प्रकरणी राज्य सरकारतर्फे चौकशी होणार-अनिल देशमुख

प्रताप सरनाईक आणि सुनील प्रभूंनी केली होती लेखी तक्रार

अभिनेत्री कंगना रणौत ड्रग्ज सेवन करते का? याची राज्य सरकारतर्फे चौकशी केली जाणार आहे अशी माहिती महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.  मुंबई आणि महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्या कंगनाविरोधात कारवाई केली जावी यासंदर्भात प्रताप सरनाईक यांनी विधानसभा अध्यक्षांकडे तक्रार केली होती. त्यावर उत्तर देत असताना महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी उत्तर दिलं. त्यात ते असं म्हणाले की अध्ययन सुमनसोबत कंगना रणौतचे प्रेमसंबंध होते. अध्ययन सुमनने एका मुलाखतीत असं सांगितलं होतं की कंगना ड्रग्ज घेते आणि ते घेण्यासाठी मलाही बळजबरी करते. अध्ययन सुमनच्या या वक्तव्याच्या आधारे ही चौकशी केली जाणार आहे असं अनिल देशमुख यांनी स्पष्ट केलं आहे. या प्रकरणी मुंबई पोलीसही लक्ष घालतील असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

As per request submitted by MLAs Sunil Prabhu & Pratap Sarnaik, I answered in Assembly & said that Kangana Ranaut had relations with Adhyayan Suman, who in an interview said she takes drugs & also forced him to. Mumbai Police will look into details of this: Maharashtra Home Min pic.twitter.com/4ztVcqtP71

कंगनाने मुंबई ही आपल्याला पाकव्याप्त काश्मीरसाखी वाटते असं वक्तव्य केलं होतं. ज्यानंतर तिच्यावर कलाक्षेत्रातून आणि राजकीय क्षेत्रातून टीकेची झोड होती. एवढंच नाही तर संजय राऊत आणि कंगना यांच्यात आरोपांच्या फैरीही झडल्या. अशा सगळ्यात अधिवेशनामध्ये कंगनाचा विषय समोर आणला गेला. कंगनाविरोधात हक्कभंग प्रस्तावही आणला गेला. मी ९ तारखेला मुंबईत येणार आहे कुणाची हिंमत असेल तर अडवा असं आव्हानही कंगनाने दिलं. त्यानंतर आजच्या अधिवेशनात कंगनाचा विषयही समोर आला. तिच्याविरोधात हक्कभंग प्रस्तावही आणला गेला. ज्यानंतर आता अनिल देशमुख यांनी अध्ययन सुमनने केलेल्या वक्तव्यांच्या आधारे महाराष्ट्र सरकार कंगनाचीही चौकशी करणार आहे असं म्हटलं आहे. कंगनाविरोधात सुनील प्रभू आणि प्रताप सरनाईक या दोघांनीही विधानसभा अध्यक्षांकडे तक्रार केली होती. या तक्रारीला उत्तर देताना ड्रग्ज प्रकरणात कंगनाची चौकशी होईल असं अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 8, 2020 2:21 pm

Web Title: kangana to be questioned in drug case says maharashtra hm anil deshmukh scj 81
टॅग Kangana Ranaut
Next Stories
1 “जशी राऊत औषधे डॉक्टरऐवजी कंपाऊंडरकडून घेतात त्याप्रमाणे…”; ‘नॉटी’ कमेंटवरुन भाजपा नेत्याचा टोला
2 …अन्यथा बेकायदेशीर बांधकाम पाडू, मुंबई महापालिकेची कंगनाला नोटीस
3 पूर्वीचे लोक कृतज्ञता बाळगायचे..
Just Now!
X