25 September 2020

News Flash

धार्मिक तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न!

१७ संघटनांच्या वतीने संविधान बचाव रॅली

रविवारी संविधान बचाव रॅली काढण्यात आली. त्यात कन्हैयाकुमार, जिग्नेश मेवानी, हार्दिक पटेल सहभागी झाले होते. (छाया-प्रशांत नाडकर)

कन्हैयाकुमार यांचा आरोप; १७ संघटनांच्या वतीने संविधान बचाव रॅली

केंद्र सरकार सर्वोच्च न्यायालय व सीबीआयसह अनेक महत्त्वाच्या संस्थांवर वर्चस्व ठेवू पाहात आहे असा आरोप करत  मुंबईत रविवारी १७ विविध संघटनांनी संविधान बचाव रॅलीचे आयोजन केले.

देशासमोर अनेक महत्त्वाचे प्रश्न असताना निवडणुकीच्या तोंडावरच नेमका राम मंदिराचा प्रश्न का उभा केला जातो हे आता लोक ओळखून असल्याचे विद्यार्थी नेते कन्हैयाकुमार यांनी सांगितले. आज देशात कोणतेही धार्मिक संकट नाही. मुस्लीम व हिंदूंमध्ये कोणताही तणाव नाही मात्र तो निर्माण करण्यासाठी वातावरण तापविण्याचे काम केले जात आहे असा आरोप त्यांनी केला.

चेंबूरमधील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून ते दादरच्या चैत्यभूमीपर्यंत ही संविधान बचाव रॅली काढण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम, नबाब मलिक यांच्यासह कन्हैयाकुमार, गुजरातचे आमदार जिग्नेश मेवानी, हार्दिक पटेल, भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांच्यासह १७ संघटना या रॅलीमध्ये सामील झाल्या होत्या.

यावेळी हार्दिक पटेल यांनी उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यावर टीका के ली. मंदिर महत्त्वाचे की शेतकऱ्यांच्या आत्महत्या असा सवाल त्यांनी उपस्थित केला. अयोध्येत १४४ कलम लागू असतानाही शिवसेना व विश्व हिंदू परिषद आणि संघाचे कार्यकर्ते मोठय़ा प्रमाणात कसे उपस्थित राहू शकले, असा मुद्दा उपस्थित करत पटेल म्हणाले की, आम्ही मोर्चा काढला तर तात्काळ कारवाई होते. केंद्र सरकार  सर्वोच्च न्यायालय व सीबीआयसारख्या संस्थांवर आपला ताबा प्रस्थापित करू पाहात आहे. त्यामुळे ‘संविधान जागर’करण्याची  गरज निर्माण झाली आहे. मंदिराऐवजी शाळा किती बांधल्या व रुग्णालये किती बांधली असा सवाल सरकारला करा, असे आवाहनही त्यांनी केले.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 26, 2018 12:41 am

Web Title: kanhaiya kumar on bjp
Next Stories
1 ‘सनातन’ला वाचवणारे सरकारमधील साधक कोण? -चव्हाण
2 उपनगरीय रेल्वेला सुरक्षा कवच
3 दहशतवादी हल्ला झाल्यास त्वरित बीमोड!
Just Now!
X