News Flash

कपिल आणि धीरज वाधवान यांना दिलासा नाहीच

न्यायमूर्ती भारती डांगरे यांनी दोन्ही प्रकरणात वाधवान यांनी अटकपूर्व जामिनासाठी केलेली याचिका फेटाळली.

संग्रहित छायाचित्र

येस बँकेतील गैरव्यवहाराप्रकरणी अटकेत असलेले डीएचएफलचे धीरज आणि कपिल वाधवान या दोघांना उच्च न्यायालयाने मंगळवारी अटकपूर्व जामीन देण्यास नकार दिला.

येस बँक गैरव्यवहाराप्रकरणी सीबीआयने वाधवान यांना अटक केली होती. दोघेही सध्या कारागृहात असून गेल्याच आठवडय़ात त्यांनी येस बँक तसेच उत्तर प्रदेश वीज महामंडळाच्या कर्मचारी भविष्यनिधीत अनियमितता केल्याप्रकरणी अटकपूर्व जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

न्यायमूर्ती भारती डांगरे यांनी दोन्ही प्रकरणात वाधवान यांनी अटकपूर्व जामिनासाठी केलेली याचिका फेटाळली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 13, 2020 12:24 am

Web Title: kapil and dheeraj wadhwan are not relieved abn 97
Next Stories
1 ‘शासकीय बदल्यांवर सरसकट बंदी अन्यायकारक’
2 टाळेबंदीत मुंबईत फक्त २८ करारांची नोंदणी
3 Coronavirus : राज्यभरात आतापर्यंत करोनाचे पाच हजार रुग्ण बरे झाले : राजेश टोपे
Just Now!
X