08 August 2020

News Flash

पुजारीचा ताबा देण्यास कर्नाटक न्यायालयाचा नकार

कर्नाटक पोलिसांनी पुजारील फेब्रुवारी महिन्यात सेनेगल येथून प्रत्यार्पित केले होते.

संग्रहित छायाचित्र

संघटित गुन्हेगारी टोळीचा म्होरक्या रवी पुजारी याचा ताबा मुंबई पोलिसांना देण्यास सोमवारी कर्नाटक न्यायालयाने नकार दिला. यावेळी कर्नाटक पोलिसांनी एका गंभीर गुन्ह्य़ात न्यायालयीन प्रक्रिया अपूर्ण राहिल्याची सबब पुढे करून मुंबई पोलिसांच्या अर्जाला विरोध के ला होता. तेथील न्यायालयाने ती ग्राह्य़ धरल्याचे, गुन्हे शाखेतील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

कर्नाटक पोलिसांनी पुजारील फेब्रुवारी महिन्यात सेनेगल येथून प्रत्यार्पित केले होते. तेथे दाखल गुन्ह्य़ांचा तपास पूर्ण के ल्यानंतर पुजारीचा ताबा मुंबई पोलिसांना मिळणार होता. गेल्या आठवडय़ात गुन्हे शाखेने पुजारीचा ताबा घेण्यासाठी न्यायालयातून ट्रान्स्फर वॉरंट मिळवले. मात्र एका दुहेरी हत्याकांड प्रकरणाचा खटला दंडाधिकारी न्यायालयातून सत्र न्यायालयात वर्ग करण्याची प्रक्रिया शिल्लक आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 7, 2020 12:26 am

Web Title: karnataka court refuses to hand over ravi pujari abn 97
Next Stories
1 ‘सहज बोलता बोलता’मध्ये सुबोध भावे
2 झोपु योजनेच्या मंजुरीचा कालावधी कमी
3 ठाकरे सरकारच्या मदतीला पुन्हा धावले टाटा, प्लाझ्मा थेरपीसाठी १० कोटी, १०० व्हेंटिलेटर्स
Just Now!
X