News Flash

सोशल मीडियावरून शिक्षिकेला त्रास; कासारवडवलीत एकाविरोधात गुन्हा

गत जून महिन्यांपासून हा युवक सातत्याने पीडितेला त्रास देत होता.

सोशल मीडियावरून एका शिक्षिकेला त्रास दिल्याप्रकरणी एका ३० वर्षीय युवकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोशल मीडियावरून एका शिक्षिकेला त्रास दिल्याप्रकरणी एका ३० वर्षीय युवकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोशल नेटवर्किंग साइटवर हा संशयित युवक २४ वर्षीय शिक्षिकेला एक वर्षांपासून फॉलो करत होता. काही दिवसांपूर्वी त्या युवकाने पीडितेसमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला होता. यासाठी त्याने पीडित शिक्षकेच्या आईला सांगितले होते. जर युवतीबरोबर माझं लग्न न लावून दिल्यास तिला पळवून नेईल आणि चेहऱ्यावर अॅसिड टाकेल अशी धमकी दिली होती. त्याने पीडित युवतीच्या आईलाही जीवे मारण्याची धमकी दिली होती, असे पोलिसांनी सांगितले.
गत जून महिन्यांपासून हा युवक सातत्याने पीडितेला त्रास देत होता. अखेर कंटाळून या युवतीने कासारवडवली पोलीस ठाण्यात रविवारी रात्री गुन्हा दाखल केला. संशयितावर भारतीय दंडविधान कलम ३५४ अंतर्गत (ड) (१) (२) आणि कलम ५०६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नसल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पी. डी. तेले यांनी माहिती दिली. या प्रकरणी पोलीस पुढील तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 16, 2017 1:25 pm

Web Title: kasarvadvali man booked for stalking school teacher on social media
Next Stories
1 मॅरेथॉनमध्ये २५०० मुंबईकर जखमी
2 सरकत्या जिन्यांमध्ये आता ‘स्मार्ट चिप’
3 गर्भपातप्रकरणी न्यायालयाच्या निर्णयाची प्रतीक्षा
Just Now!
X