25 November 2020

News Flash

शांतता क्षेत्रात ‘केईएम’च्या डॉक्टरांचा धांगडधिंगा

आसपास अनेक रुग्णालये व निवासी वस्ती असल्यामुळे ‘शांतता क्षेत्र’ घोषित असलेल्या परळच्या केईएम रुग्णालय परिसरात शुक्रवारी डॉक्टरांनीच शांततेचा भंग केला.

| September 7, 2013 01:26 am

आसपास अनेक रुग्णालये व निवासी वस्ती असल्यामुळे ‘शांतता क्षेत्र’ घोषित असलेल्या परळच्या केईएम रुग्णालय परिसरात शुक्रवारी डॉक्टरांनीच शांततेचा भंग केला. प्रशिक्षणार्थी डॉक्टरांनी शुक्रवारी रुग्णालयाच्या आवारातच डीजे पार्टीचे आयोजन केले होते. हा दणदणाट असह्य होत असताना पोलिसांनीही बघ्याची भूमिका घेतली. अखेर काही रुग्णांच्या तक्रारीनंतर हा धांगडधिंगा थांबवण्यात आला.
परळच्या केईएम रुग्णालयात      शिकण्यासाठी आलेल्या प्रथम वर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी शुक्रवारी संध्याकाळी ‘स्वागत पार्टी’चे आयोजन करण्यात आले होते. रुग्णालयाच्या आवारातील हिरवळीवर ठेवण्यात आलेल्या या पार्टीत मोठमोठय़ा आवाजात डीजे लावण्यात आले होते. त्यावर शंभरहून अधिक प्रशिक्षणार्थी डॉक्टर नाचत, शिटय़ा वाजवत होते. केईएमसमोरच लहान मुलांचे वाडिया रुग्णालय आहे तर जवळच टाटा कर्करोग रुग्णालय आहे. मात्र, या ‘उद्याच्या डॉक्टरांना’ याचे अजिबात भान  नव्हते.  विशेष म्हणजे याठिकाणी असलेले पोलीसही मूग गिळून ही पार्टी पहात होते.
मोठा आवाज सुरू असल्याची माहिती मिळताच मी पार्टी बंद केली, असे केईएम रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ संध्या कामत यांनी सांगितले. विद्यार्थ्यांना पार्टीसाठी  बाहेर पाठवणे धोक्याचे ठरू शकते म्हणून त्यांना आवारात परवानगी दिल्याचे त्या म्हणाल्या. यापुढे विद्यार्थ्यांना अशी परवानगी मिळणार नाही, असे त्या म्हणाल्या.
सुरुवातीला बघ्याची भूमिका घेणाऱ्या पोलिसांनी नंतर डीजेवर कारवाई करून १२,५०० रुपयांचा दंड ठोठावला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 7, 2013 1:26 am

Web Title: kem hospital doctors horseplays at silence zon dance on dj at hospital premises
Next Stories
1 शिक्षकांची भरती सरकारच्या हातात
2 विद्यार्थ्यांच्या मद्यपार्ट्यांविरुद्ध राज्य सरकारने कंबर कसली!
3 मुंबई लोकल: महिलेवर पुन्हा हल्ला
Just Now!
X