News Flash

खडसेंच्या जावयाला १९ जुलैपर्यंत ईडीची कोठडी

पुणे येथील जमीन घोटाळा आणि आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात गेल्या आठवड्यात केली होती अटक

माहिती दडवत असल्याचा ईडीचा आरोप

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना सक्तवसुली संचालनालयाने पुणे येथील जमीन घोटाळा आणि आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात गेल्या आठवड्यात अटक केली होती. विशेष न्यायालयाने गिरीश यांना १२ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश होते. दरम्यान, ईडीने त्यांना १९ जुलैपर्यंत ईडी कोठडी सुनावली आली आहे.

ईडीने गेल्या आठवड्यात मंगळवारी गिरीश यांना चौकशीसाठी बोलावले होते. अनेक तास चौकशी केल्यानंतर बुधवारी पहाटे त्यांना अटक करण्यात आली होती. गिरीश चौकशीस सहकार्य करत नाहीत, प्रकरणाशी संबंधित माहिती ते दडवत आहेत, अशी माहिती ईडीने न्यायालयाला दिली होती.

ईडीच्या आरोपानुसार २०१६मध्ये खडसे महसूलमंत्री असताना पुण्यातील भोसरी येथील एमआयडीसीच्या मालकीचा भूखंड गिरीश यांच्या नावे विकत घेतला गेला. पुण्यातील एका व्यावसायिकाने या व्यवहाराविरोधात बंडगार्डन पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या तक्रारीआधारे चौकशी, तपास करून खडसे, त्यांच्या पत्नी मंदाकिनी, गिरीश यांच्यासह जागेचे मूळ मालक अब्बार उकाणी यांच्याविरोधात गुन्हा नोंदवला. या घडमोडीचा आधार घेत ईडीने समांतर तपास सुरू केला. गेल्यावर्षी ऑक्टोबर महिन्यात ईडीने खडसे कुटुंबीयांविरोधात गुन्हा (ईसीआयआर) नोंदवला. डिसेंबर महिन्यात ईडीने खडसे यांना समन्स जारी करत चौकशीस हजर राहण्याची सूचना केली होती. खडसे जानेवारी महिन्यात ईडीसमोर हजर झाले. त्यांची सहा तास चौकशी करण्यात आली होती.

हेही वाचा- एकनाथ खडसेंनी पदाचा गैरवापर केला; झोटिंग समितीच्या अहवालात ठपका

काय आहे प्रकरण?

एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावाई गिरीश चौधरी यांनी २८ एप्रिल २०१६ रोजी भोसरी एमआयडीसी येथील सव्‍‌र्हे क्र. ५२/२ अ ही जमीन अब्बास रसुलभाई उकानी नामक मूळ जमीन मालकाकडून ३.७५ कोटी रुपयांना खरेदी केली. नोंदणी निबंधकांच्या कार्यालयात या व्यवहाराची रीतसर नोंद केली. अशा प्रकारे एमआयडीसीच्या ताब्यात असलेल्या व त्यांच्या मालकीच्या जमिनीचे खडसे कुटुंबीय सरकारी कागदोपत्री मालक झालेले आहेत. या सर्व व्यवहारात सुमारे ६१ कोटी रुपयांच्या महसुलाचं नुकसान झाल्याचं सकृतदर्शनी दिसून येत आहे. हा मोठा गैरव्यवहार असल्याचा ‘ईडी’ला संशय आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 15, 2021 3:35 pm

Web Title: khadse son in law to be remanded in ed custody till july 19 srk 94
Next Stories
1 नितीन राऊतांचा खासगी कामासाठी सरकारी पैशातून विमान प्रवास; हायकोर्टाने मागितलं उत्तर
2 “आधी बैलगाडीतून कोसळले, आता घरंगळत जाऊ नका म्हणजे झालं”; पटोलेंना भाजपाचा टोला
3 गणेशभक्तांना कोकणात जाण्यासाठी २२०० जादा गाड्या
Just Now!
X