News Flash

अपहरणाचा प्रयत्न फसला

शहरातील लहान मुलांच्या अपहरणाच्या घटनांमध्ये वाढ होत असताना पायधुनी येथे एका सात महिन्यांच्या मुलीला पळवून नेण्याचा प्रयत्न फसला आहे.

| July 27, 2015 07:15 am

शहरातील लहान मुलांच्या अपहरणाच्या घटनांमध्ये वाढ होत असताना पायधुनी येथे एका सात महिन्यांच्या मुलीला पळवून नेण्याचा प्रयत्न फसला आहे. पालकांना वेळीच लक्षात आल्याने एका टॅक्सीचालकाच्या मदतीने अपहरणकर्त्यांला पकडण्यात यश आले आहे.
जेजे उड्डाणपुलाखालील सिग्नलजवळ जावेद शेख आणि रेश्मा हे दाम्पत्य सात महिन्यांच्या शबानासह राहते. शनिवारी रात्री ते याच ठिकाणच्या शेगडी हॉटेलजवळील पदपथावर शबानासह झोपले होते. मध्यरात्री दीडच्या सुमारास रेश्माला जाग आली असता मुलगी नसल्याचे लक्षात आले. त्यांनी त्वरित शोधाशोध सुरू केली.
दरम्यान एका टॅक्सीचालकाने एक इसम मुलीला घेऊन जात असल्याचे पाहिले होते. त्याने शेख दाम्पत्याला आपल्या टॅक्सीत बसवून आरोपीचा शोध सुरू केला. काही वेळातच महम्मद अली रोडवर आरोपी जावेद शेख मुलीला घेऊन जात असल्याचे त्यांना दिसला.
गस्तीवरील पोलिसांना हा प्रकार सांगताच त्यांनी जावेदला ताब्यात घेतले. पायधुनी पोलिसांनी जावेदला अपहरणाच्या गुन्ह्यात अटक केली. रविवारी त्याला न्यायालयात हजर केले असता २८ जुलैपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 27, 2015 7:15 am

Web Title: kidnapping plan trap
Next Stories
1 पंचतारांकित पबमध्ये जोडप्याला प्रवेश नाकारला
2 वादग्रस्त ट्विप्पणीमुळे सलमान अडचणीत
3 ‘इस्टेट इन्व्हेस्टमेंट’च्या ताब्यातून जमिनी मुक्त
Just Now!
X