मुंबई : संगीत, क्रिकेट, समाजकारण आणि उद्योग क्षेत्रात नावलौकिक मिळवणारे किरण जोगळेकर (वय ५७)यांचे शुक्रवारी हृदयविकाराने निधन झाले.  नोकरी निमित्त ३५ वर्षांहून अधिक काळ अमेरिकेत वास्तव्यास असूनही त्यांनी महाराष्ट्र आणि मराठी संस्कृतीशी जोडलेली नाळ तुटू दिली नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. अमेरिकेतल्या बृहन्महाराष्ट्र मंडळासाठी त्यांनी अनेक उपक्रम राबवले. जोगळेकर यांनी शास्त्रीय तसेच नाट्य संगीताचे शिक्षण घेतले होते. तबला, ढोलकी, मृदुंग आदी तालवाद्य वाजवण्यात ते पारंगत होते. ‘सुंदरा मनामध्ये भरली’ या त्यांच्या लावणीच्या कार्यक्रमाने जगभरात ओळख मिळवली होती.   दादरचा जन्म असणाऱ्या जोगळेकर यांनी क्रिकेटमध्येही नाव मिळवले होते. त्यांच्या पार्थिवावर शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चाात पत्नी आणि मुलगा असा परिवार आहे.