‘आदर्श’ गैरव्यवहार प्रकरणी आता ‘भाजप’ने आक्रमक भूमिका घेतली आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, सुनील तटकरे आदींविरोधात माजी खासदार डॉ. किरीट सोमय्या यांनी बुधवारी मरीनड्राईव्ह पोलिस ठाण्यात  तक्रार दाखल केली.
या गैरव्यवहारप्रकरणी चौकशी अहवाल फेटाळण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना कानपिचक्या दिल्यावर आता हा अहवाल स्वीकारण्याबाबत राज्य सरकार विचार करीत आहे.
सरकारला कोंडीत पकडण्यासाठी विरोधी पक्षही सरसावले असून आता पोलिसांकडे भारतीय दंडविधानाच्या कलम ४२०, ४६३, ४६७,४७१, ४७८ या कलमांनुसार गुन्हा दाखल करणार असल्याचे डॉ. सोमय्या यांनी सांगितले. जादा चटईक्षेत्र निर्देशांक मिळविणे, फ्लॅटच्या बदल्यात मंजुऱ्या देणे, आदी बाबींसाठी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला जाणार आहे.