17 January 2021

News Flash

किरीट सोमय्यांनी साधला संजय राऊतांवर निशाणा, म्हणाले…

वर्षा राऊत यांना 'ईडी'ने समन्स बजावल्यावरून केली आहे टिप्पणी

संग्रहीत

शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी)समन्स बजावलं आहे. पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी त्यांना ही नोटीस बजावण्यात आली आहे. शिवाय, मंगळवार २९ डिसेंबर रोजी त्यांना ईडी कार्यालयात हजर राहण्यास देखील सांगण्यात आलं आहे. या पार्श्वभूमीवर भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.

पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी यांच्या पत्नीला ईडीने नोटीस पाठवली असल्याचं म्हटलं जात आहे. मी संजय राऊत यांना विचारू इच्छितो, तुमचा तुमच्या कुटुंबाचा पीएमसी बँकेसोबत काही आर्थिक व्यवहार झाला होता का? काय आर्थिक व्यवहार झाला होता, तो देखील जनतेसमोर मांडावा. तुमच्याकडे या अगोदरही या संबधी काही माहिती कुठली नोटीस आली होती का? ही बाब देखील जनतेसमोर मांडावी. दहा लाख लोकांचे पैसे पीएमसी बँकेत अडकेलेले आहेत. पीएमसी बँक पुनर्जीवित व्हायला हवी असे आमचे प्रयत्न आहेत. त्याचप्रकारे तिच्या लाभार्थींची देखील चौकशी व्हायलाच हवी. असं किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे.

कलम ६७ अंतर्गत ही नोटीस बजावण्यात आलेली आहे. त्यामुळे आता वर्षा राऊत यांना ईडीच्या चौकशीला सामोरं जावं लागणार आहे. अद्याप तरी संजय राऊत किंवा वर्षा राऊत यांच्याकडून याबाबत कुठलीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही. पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून काहीजणांची चौकशी सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर एका जुन्या प्रकरणाच्या चौकशीत वर्षा राऊत यांचं नाव समोर आल्याने, त्यांना समन्स बजावण्यात आलेलं आहे.

शिवसेना नेते संजय राऊत यांच्या पत्नीला ‘ईडी’कडून समन्स

या अगोदर महाविकासआघाडीच्या नेत्यांना ईडीकडून समन्स बजावण्यात आलेलं आहे. त्यावरून संजय राऊत यांनी भाजपावर जोरदार टीका केलेली आहे. आता त्यांच्या पत्नीला ईडीची नोटीस आल्याने, संजय राऊत नेमकी कशी भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागलेलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 27, 2020 7:52 pm

Web Title: kirit somaiya targeted sanjay raut said msr 87
Next Stories
1 शिवसेना नेते संजय राऊत यांच्या पत्नीला ‘ईडी’कडून समन्स
2 अ‍ॅमेझॉननंतर मनसेने पश्चिम रेल्वेकडे वळवला मोर्चा, दिला ‘हा’ इशारा
3 इमारतीच्या गच्चीवरही ‘नो पार्टी’; मुंबईकरांवर ३५ हजार पोलीस ठेवणार नजर
Just Now!
X