मुंबईतील शेतकऱ्यांच्या मोर्चाला काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पाठिंबा दर्शवला आहे. ‘मुंबईतील शेतकऱ्यांच्या मोर्चातून जनशक्तीचे दर्शन घडते. काँग्रेसचा या मोर्चाला पाठिंबा असून पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी अहंकार बाजूला ठेवून शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य कराव्यात, असे मत राहुल गांधींनी मांडले.
सोमवारी मुंबईतील शेतकऱ्यांच्या मोर्चावर राहुल गांधी यांनी ट्विटरवरुन प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, मुंबईतील शेतकऱ्यांचा मोर्चा हे जनशक्तीचे उत्तम उदाहरण आहे. काँग्रेसचा मोर्चाला पाठिंबा असून केंद्र व राज्य सरकारच्या अन्यायाविरोधात काँग्रेस शेतकरी व कामगारांच्या पाठिंशी आहे, असे त्यांनी सांगितले. हा फक्त महाराष्ट्रातील नव्हे तर संपूर्ण देशातील शेतकऱ्यांचे आंदोलन आहे. देशभरातील शेतकऱ्यांना कठीण प्रसंगांना सामोरे जावे लागत आहे, असे त्यांनी नमूद केले.
The mammoth #FarmersMarchToMumbai is a stunning example of people’s power. The Congress party stands with the Farmers & Tribals marching to protest against the Central & State Govts. apathy.
I appeal to PM Modi and the CM to not stand on ego and to accept their just demands.
— Office of RG (@OfficeOfRG) March 12, 2018
दरम्यान, विधान सभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी देखील सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे. हजारो शेतकऱ्यांचा मोर्चा मुंबईत धडकल्याने आता सरकारला जाग आली आहे. आता सरकार चर्चेचे निमंत्रण देत आहेत. हाच समजूतदारपणा त्यांनी आधी का नाही दाखवला, असा सवाल करत काहीही झाले तरी सरकारला शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण कराव्याच लागतील, असे त्यांनी ठणकावून सांगितले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on March 12, 2018 2:21 pm