01 October 2020

News Flash

महापौरपदासाठी सेनेकडून किशोरी पेडणेकर

बदलत्या राजकीय समीकरणाचे मुंबईच्या महापौर निवडणुकीत पडसाद उमटतील, अशी शक्यता वर्तविली जात होती

 

आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघाला झुकते माप :- मुंबईचे महापौरपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुले असताना शिवसेनेने ज्येष्ठ नगरसेविका किशोरी पेडणेकर यांना अनपेक्षितपणे महापौरपदासाठी संधी दिली. पेडणेकर यांना महापौरपद देऊन शिवसेनेने युवा नेते आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघाला झुकते माप दिले आहे.

बदलत्या राजकीय समीकरणाचे मुंबईच्या महापौर निवडणुकीत पडसाद उमटतील, अशी शक्यता वर्तविली जात होती. भाजप आणि काँग्रेस एकत्र येणार, अशी चर्चा सुरू झाली होती. पण, भाजपने निवडणूक लढविणार नाही, असे सोमवारी सकाळीच जाहीर केल्याने निवडणुकीतील चुरस संपुष्टात आली. महापौरपदासाठी शिवसेनेच्या किशोरी पेडणेकर यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने महापौरपदासाठी त्यांची निवड ही औपचारिकता ठरली आहे. उपमहापौरपदासाठी शिवसेनेने अ‍ॅड. सुहास वाडकर यांना उमेदवारी जाहीर केली. शिवसेनेमध्ये महापौरपदासाठी अनेक जण इच्छुक होते. पण, शिवसेनेने किशोरी पेडणेकर यांना संधी दिली. युवा नेते आदित्य ठाकरे यांनी वरळी मतदारसंघातून निवडणूक लढविली आणि ते मोठय़ा मताधिक्याने विजयी झाले. पेडणेकर या प्रतिनिधीत्व करीत असलेला प्रभाग हा वरळी मतदारसंघातच येतो. आदित्य यांच्या प्रचारात पेडणेकर यांनी बरीच मेहनत घेतली होती. याचे फळ त्यांना मिळाले. पेडणेकर यांची महापौरपदी निवड झाल्याने वरळी मतदारसंघात पालिकेच्या माध्यमातून जास्तीत जास्त कामे केली जाण्याची शक्यता आहे.

भाजपची माघार

महापौरपदाच्या निवडणुकीत काँग्रेसच्या मदतीने भाजपचा उमेदवार निवडून आणला जाईल, अशा चर्चा सुरू होत्या. भाजपकडून आपल्याला अशी विचारणा झाल्याचा दावा विरोधी पक्षनेत्यांनीही केला होता. मात्र पुरेसे संख्याबळ नसल्यामुळे महापौरपदाची निवडणूक लढवणार नसल्याचे सोमवारी सकाळीच भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी  स्पष्ट केले. त्याचबरोबर २०२२ च्या पालिका निवडणुकीत मात्र भाजपचा महापौर निवडून आणू, असा इशाराच शिवसेनेला दिला आहे. भाजप पहारेकऱ्यांच्या भूमिकेतून बाहेर पडून विरोधी पक्षनेते पदावर दावा करणार का, हे आता लवकरच समजेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 19, 2019 2:47 am

Web Title: kishore pednekar sena mayor post akp 94
Next Stories
1 अवजड वाहतुकीविरोधात गिरगावात जनक्षोभ
2 त्रुटी असणाऱ्या अभियांत्रिकी महाविद्यालयांना मोकळे रान
3 नुकसान भरपाईची रक्कम दोन दिवसांत न्यायालयात जमा करा
Just Now!
X