कोहिनूर गैरव्यवहारप्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना सक्तवसूली संचलनालयाकडून (ईडी) समन्स बजावण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर लालबाग परळ परिसरात ईडीविरोधात अज्ञातांनी काही पत्रकं वाटल्याचा प्रकार समोर आला आहे. या घोटाळेबाजांना कधी ‘नोटीस’ पाठवणार अशा आशयाची पत्रकं लालबाग परळ परिसरात वाटल्याची पहायला मिळाली. यामध्ये अनेक दिग्गजांच्या नावांचा समावेश करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नोटबंदीनंतर अमित शाह संचालक असलेल्या बँकेमध्ये केवळ 5 दिवसांमद्ये 745 कोटी रूपये कसे जमा झाले?, अमित शाह यांच्या मुलाच्या कंपनीने एका वर्षात 16 हजार पट नफा कसा मिळवला?, प्रविण दरेकरांचा मुंबै बँक घोटाळा भाजपा प्रवेशानंतर कसा विस्मरणात गेला?, मुख्यमंत्र्यांच्या पत्नी कार्यरत असलेल्या अॅक्सिस बँकेला पोलिसांची खाती उघडण्याची परवानगी कशी देण्यात आली?, प्रकाश महेतांच्या जमीन घोटाळ्यांची चौकशी कोण करणार? असे अनेक सवाल या पत्रकातून करण्यात आले आहेत.

दरम्यान, ही लालबाग परळ या भागामध्ये ही पत्रकं दिसून आली. ही पत्रक कोणी वाटली आणि यामागे नक्की कारण काय याबाबत माहिती मिळू शकली नाही.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kohinoor mill case raj thackeray lalbaug parel handbills distributed by unknown jud
First published on: 22-08-2019 at 10:07 IST