गणेशोत्सवासाठी ट्रेनने कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचे प्रचंड हाल होत आहेत. कोकण रेल्वेचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडले आहे. गाडया अर्धा तास ते पाच तास उशिराने धावत आहेत. गणेशोत्सवासाठी कोकणात जादा गाडया सोडण्यात आल्या आहेत. रडतखडत सुरु असलेल्या या प्रवासामुळे कोकण रेल्वेच्या प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.

कोकण रेल्वेच्या या नियोजनशून्य कारभारावर अनेक प्रवाशांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. रेल्वेने जादा गाडया सोडल्या पण वेळापत्रकाच्या नियोजनाचे काय ? असा सवाल प्रवाशांनी विचारला आहे. ट्रेन बंचिंगमुळे वेळापत्रक कोलमडल्याचे बोलले जात आहे.

रात्री निघालेल्या अनेक ट्रेन अजूनही कोकणात पोहोचलेल्या नाहीत. अप मांडवी, कोकण कन्या, जनशातब्दी, नेत्रावती, तेजस, सावंतवाडी गणपती विशेष अशा अनेक गाडया उशिराने धावत आहेत.