दरवर्षीप्रमाणे यंदाही होळीनिमित्त कोकणात जाण्यासाठी प्रवाशांची गर्दी उसळली असून बहुतांश एक्स्प्रेस फुल झाल्या आहेत. यात राज्यराणी एक्स्प्रेस, जनशताब्दी एक्स्प्रेस आणि कोकणकन्या एक्स्प्रेसचा समावेश आहे.
विशेष म्हणजे पश्चिम रेल्वेने मुंबई सेंट्रल ते मडगाव या विशेष गाडीचे आरक्षण अवघ्या तीन मिनिटांत फुल झाल्याचे सांगण्यात आले.
होळीनिमित्त गावी जाणाऱ्या मुंबईकरांसाठी मध्य आणि पश्चिम रेल्वेने विशेष गाडय़ा चालवल्या आहेत. या गाडय़ांप्रमाणे नियमित गाडय़ांनाही प्रवाशांनी भरघोस प्रतिसाद दिला आहे. यात आरक्षित तिकिटांची मुदत वाढल्याने प्रवाशांनी महिनाभरापूर्वीच तिकिटे आरक्षित केली आहेत. त्यामुळे अनेक एक्स्प्रेसची तिकिटे मिळवताना कठीण झाल्याने प्रवासी खासगी वाहनांनी प्रवास करण्याचा मार्ग अवलंबत आहेत.
२३ आणि २४ मार्चला कोकणकन्या एक्स्प्रेसची प्रतीक्षा यादी अनुक्रमे ४०१ आणि ३१० आहे. मांडवी एक्स्प्रेसची प्रतीक्षा यादी अनुक्रम ३०६ आणि ३०१ आहे.
राज्यराणी एक्स्प्रेसची प्रतीक्षा यादी अनुक्रमे ३६० आणि ४०० तर जनशताब्दी एक्स्प्रेसची प्रतीक्षा यादी अनुक्रमे ४०१ आणि ४०० आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on March 23, 2016 4:00 am