पावसाळ्यात हमखास कोलमडणारे कोकण रेल्वेचे वेळापत्रक ऐन उन्हाळ्याच्या सुरुवातीला कोलमडले. गुरुवारी संध्याकाळी कोकण रेल्वेच्या अप आणि डाउन मार्गावरील गाडय़ा तब्बल एक ते सात तास उशिराने धावत होत्या. गाडय़ा एकामागोमाग एक खोळंबल्याने वेळापत्रक कोलमडल्याची माहिती सूत्रांनी दिली. मात्र गाडय़ा खोळंबल्याचे कारण मात्र अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. या गोष्टीमुळे अचानक गाडय़ा उशिरा धावू लागल्या. मांडवी एक्सप्रेस (सात तास), जनशताब्दी एक्सप्रेस (तीन तास), संपर्क क्रांती एक्सप्रेस (तीन तास), मंगला एक्सप्रेस (चार तास), नेत्रावती एक्सप्रेस (दोन तास) असा खोळंबा झाला होता. परिणामी प्रवासी प्रचंड संतापले होते.