News Flash

कोकण विभागातील रिक्षा बंदमधून बाहेर

रिक्षा चालकांच्या मागण्यांसाठी २२ ते २४ ऑगस्ट रोजी शरद राव यांनी पुकारलेल्या तीन दिवसांच्या बंदमध्ये सहभागी न होण्याचा निर्णय कोकण विभागातील ठाणे

| August 19, 2013 03:40 am

रिक्षा चालकांच्या मागण्यांसाठी २२ ते २४ ऑगस्ट रोजी शरद राव यांनी पुकारलेल्या तीन दिवसांच्या बंदमध्ये सहभागी न होण्याचा निर्णय कोकण विभागातील ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्य़ांतील रिक्षाचालकांनी घेतला आहे. बंद काळात कोकण विभागातील रिक्षा कोणाच्याही दबावाला बळी न पडता सुरळीत सुरू राहतील, असे कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाचे अध्यक्ष प्रकाश पेणकर यांनी सांगितले.
कल्याणमधील आचार्य रंगमंदिरात संघटनेच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. गणपती गौरीचे दिवस आले आहेत. प्रवाशांची अडवणूक करणे योग्य होणार नाही, असा विचार करून या बंदमध्ये सहभागी न होण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे पेणकर यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 19, 2013 3:40 am

Web Title: konkan rickshaw take back from strike
Next Stories
1 व्यापाऱ्याला लुटण्यासाठी दुचाकी स्वारांचा हवेत गोळीबार
2 ‘सिंधुरक्षकां’चे कुटुंबीय मुंबईत दाखल
3 गणेशोत्सव वर्गणी गोळा करण्यावरून आग्रीपाडय़ात दगडफेक
Just Now!
X