एल्गार परिषदेच्या तपासाविषयी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुन्हा शंका उपस्थित करत मोठे गौप्यस्फोट केले आहेत. “एल्गार परिषद आणि कोरेगाव भीमा ही दोन्ही प्रकरणं वेगळी आहेत. एल्गार परिषदेत १००पेक्षा अधिक संघटना सहभागी झाल्या होत्या. मात्र, परिषदेला हजर नसलेल्या लोकांवरही पोलिसांनी खटले भरले आहेत. ज्या नामदेव ढसाळांच्या गोलपिठा कविता संग्रहाला महाराष्ट्र सरकारनं पुरस्कार देऊन गौरवलं. केंद्र सरकारनं त्यांना पद्मश्री दिला. त्यांची कविता वाचली म्हणून पोलिसांनी खटला भरला. पुणे पोलिसांनी केलेल्या अधिकाऱ्यांच्या गैरवापराची आणि सत्य बाहेर यायल हवं,” अशी भूमिका शरद पवार यांनी मांडली.

एल्गार परिषद आणि कोरेगाव भीमा घटनांसंदर्भात शरद पवार यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले,”एल्गार परिषद आणि कोरेगाव भीमा यांचा संबंध नाही. त्यासंबंधीचा अहवाल पोलिसांनी दिला आहे. एल्गार परिषदेत काही भाषणं केली गेली. १०० पेक्षा अधिक संघटनांचा सहभाग होता. अध्यक्षपद पी.बी सावंतांकडे होतं. पण ते न आल्यानं प्रकाश आंबेडकरांनी अध्यक्षपद भूषवलं. अनेक सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. पण, हजर नसलेल्या लोकांवर पोलिसांनी खटले भरले आणि आणि त्यांना तुरूंगात टाकलं,” असं आरोप पवार यांनी केला.

आणखी वाचा – एल्गार परिषद : सुधीर ढवळेंना नामदेव ढसाळांच्या ‘या’ कवितेमुळे अटक करण्यात आली

“पोलिसांनी खटले भरलेल्यांपैकी फक्त सुधीर ढवळे परिषदेला हजर होते. सुधीर ढवळेंनी नामदेव ढसाळांची एक कविता वाचली. ज्या गोलपिठा काव्यसंग्रहाला राज्य सरकारनं पुरस्कार दिला. केंद्र सरकारनं पद्मश्री दिला. त्यांची कविता वाचली म्हणून पोलिसांनी ढवळेंवर खटला भरला. या काव्यात एक संतापजनक ओळ आहे. लोकांच्या तीव्र भावना व्यक्त केलेल्या आहेत. कुसुमाग्रजांच्या कवितांमध्येही हा संताप आहे. साहित्य आणि काव्य आक्रमक असलं म्हणून त्यांना देशद्रोही म्हणणार का?” असा शरद पवार यांनी उपस्थित केला.

आणखी वाचा – एल्गार परिषद : केंद्राला माहिती देणारा ‘तो’ खबऱ्या कोण?; पवारांचा सवाल

सर्वोच्च न्यायालयाप्रमाणेच आमची भूमिका-

संबंध नसलेल्या लोकांना वर्ष दोन वर्ष लोकांना तुरूंगात टाकाण्यात आलं. त्यांना हवा तसा न्याय मिळालेला नाही. कोणत्याही न्यायालयात जामीन मिळाला नाही. तत्कालिन राज्य सरकारनं दिलेली माहिती पूर्ण सत्य नाही. पण, ती अशा पद्धतीनं दिली गेली की, जामीन मिळाला नाही. विशेष म्हणजे सर्वोच्च न्यायालयानंही याची स्वतंत्र चौकशी करावी असं म्हटलं आहे. तिच भूमिका आमची आहे.
आमची तक्रार पोलिसांच्या भूमिकेविषयी आहे. पुणे पोलिसांची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी आहे. त्याचबरोबर तुरूंगात असलेले लोक बाहेर यावे म्हणून मी प्रयत्न करतोय,” असं पवार म्हणाले.