‘महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व’ पु. ल. देशपांडे यांच्या जयंती दिनाच्या निमित्ताने पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीतर्फे ५ ते ८ नोव्हेंबर या कालावधीत पु. ल. युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. नाटय़, नृत्य, कला, संगीत, कार्यशाळा असे विविध कार्यक्रम या महोत्सवात होणार आहेत. ५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजता महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे.

महाकवी कालिदास यांच्या काव्यावर आधारित ऋतुसंहार’ ही नृत्यनाटिका ६ नोव्हेंबर रोजी ५.३० वाजता सादर होणार आहे. याच दिवशी सायंकाळी सव्वासहा वाजता कांचनलक्ष्मी सोनावणे यांचा ‘सावीची सावित्री कशी झाली’हा एकपात्री कार्यक्रम सादर असून सायंकाळी ६.३० वाजता गौरी दाढी व ज्योती मतकर यांचे कीर्तन सादर होणार आहे.

19 candidates filed nominations for Sangli Lok Sabha elections on the last day
सांगली : अखेरच्या दिवशी १९ जणांची उमेदवारी दाखल
India to get above normal rain
दिलासा; यंदा उत्तम पावसाचा अंदाज
Ramdas Athawale
महायुतीमध्ये आम्ही नाराज, पुढील तीन दिवसांत निर्णय घेऊ, रामदास आठवलेंचा इशारा
mahesh manjrekar
“सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चित्रपट बनवणार”, महेश मांजरेकरांचं वक्तव्य; शिवसेना-मनसेबाबतही केलं भाष्य

रात्री साडेसात वाजता ‘शाहिरी फुलोरा’ हा शाहिरी जलसा रंगणार आहे.

शनिवारी ७ नोव्हेंबर रोजी सकाळी ६.३० वाजता उस्ताद अबार अहमद ‘प्रात:स्वराचे रागरंग’ संतूरवरसाडे सादर करणार आहेत. ७.३० वाजता भाग्यश्री पांचाळे यांच्या शास्त्रीय गायनाचा कार्यक्रम होणार आहे. सायंकाळी ६.३० वाजता ‘ध्वनी’ हा म्युझिकल बॅण्ड आपली कला सादर करणार आहे. याच दिवशी रात्री दहा वाजल्यापासून दुसऱ्या दिवशी सकाळी ६.०० वाजेपर्यंत महाराष्ट्रात विविध स्पर्धामधून गाजलेल्या एकांकिका सादर होणार आहेत.

८ नोव्हेंबर रोजी सकाळी ६.३० वाजता जलतरंग व सनई यांची जुगलबंदी व मृदुंग वादन होणार आहे. सकाळी दहा वाजता ‘अपूर्व पुल’ हा कार्यक्रम सादर होणार असून सायंकाळी ५.३० वाजता बाल कीर्तनकार कृष्णा महाराज फडतरे यांचे कीर्तन, सायंकाळी सहा वाजता ‘तमाशाची रंगबाजी’ हा कार्यक्रम आणि रात्री ८.३० वाजता ‘साखर खालेल्ला माणूस’ हे नाटक सादर होणार आहे.

या महोत्सवाच्या निमित्ताने सकाळी ११ ते ५ या वेळेत रंगभूषा, आवाज, लोककला, नाटक, नेपथ्य, वक्तृत्व, शाहिरी, मॉडेलिंग, चित्रकला आदी विषयांवर कार्यशाळा होणार आहेत. महोत्सवातील सर्व कार्यक्रम आणि कार्यशाळा यांना विनामूल्य प्रवेश आहे. या सर्व कार्यक्रमात जास्तीत जास्त रसिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन कला अकादमीचे संचालक आशुतोष घोरपडे यांनी केले आहे.

अधिक माहितीसाठी ९९८७७१६९१२ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.