News Flash

पाण्यासाठी ७००, तर शौचालयासाठी २७० रुपये

टाळेबंदीत श्रमिक वस्त्यांतील कु टुंबांच्या मासिक खर्चात वाढ झाल्याचा सर्वेक्षणात निष्कषर्ण

संग्रहित छायाचित्र

लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : टाळेबंदीच्या काळात मुंबईतील श्रमिक वस्त्यांमधील कु टुंबांच्या मासिक खर्चात वाढ झाली आहे. पूर्वी पाण्यासाठी महिन्याला साधारण ६०० रुपये खर्च करणाऱ्या कु टुंबाला ७०० ते ७५० रुपये खर्च करावे लागले आहेत. तसेच शौचालयाचा खर्च मासिक ५० रुपयांवरून २७० रुपयांवर गेला आहे. पाणी हक्क समिती, सेंटर फॉर प्रोमोटिंग डेमॉक्रसी आणि विकास अध्ययन केंद्र यांनी के लेल्या सर्वेक्षणातून ही बाब समोर आली आहे.

मुंबईतील ३३ वस्त्यांमधील २९२ कु टुंबे सर्वेक्षणात सहभागी झाली होती. त्यातील २५ टक्के  कु टुंबांना दररोज पाणी मिळत नाही. १९ टक्के  कु टुंबांना टाळेबंदीत पाण्यासाठी दूरवर जावे लागले. त्यामुळे ३ टक्के कु टुंबांना पोलिसी कारवाईलाही सामोरे जावे लागले.

टाळेबंदीत संपूर्ण कु टुंब घरात असल्याने आणि करोनाच्या भीतीने स्वच्छतेसाठी पाण्याचा वापर वाढला. टाळेबंदीपूर्वी काही ठिकाणांहून पाणी मोफत मिळवता येत असे; ते स्रोत बंद झाले. त्यामुळे पाणी विकत घेण्याचे प्रमाण वाढून खर्चही वाढला. महिन्याला ७०० ते ७५० रुपये म्हणजेच मासिक उत्पन्नाच्या आठ टक्के खर्च करावा लागला.

सर्वेक्षणात सहभागी कु टुंबांपैकी १८ टक्के  कु टुंबांना शौचालयाअभावी उघडय़ावर शौचास जाणे भाग पडते. ७५ टक्के कु टुंबे सार्वजनिक शौचालयाचा वापर करतात. कु टुंबासाठी सार्वजनिक शौचालयाचा मासिक पास ५० रुपयांत मिळतो, पण टाळेबंदीत करोना संसर्गाच्या भीतीने अनेक ठिकाणी शौचालये बंद ठेवण्यात आली. त्यामुळे नेहमीच्या शौचालयाऐवजी इतर शौचालयांचा वापर नागरिकांना करावा लागला. यासाठी अधिकचे पैसे मोजावे लागले. तसेच कु टुंबातील सर्व सदस्य घरीच असल्याने शौचालयाचा वापर वाढला. त्यामुळे प्रत्येक कु टुंबाला शौचालयासाठी मासिक २७० रुपये खर्च आला.

के वळ २० टक्के कु टुंबांना टाळेबंदीदरम्यान घरातील कचरा जमा करण्याची सुविधा उपलब्ध झाली. ९२ टक्के कु टुंबांना करोनापासून वाचण्यासाठी मुखपट्टी वापरण्याची जाणीव झाली आहे आणि ७६ टक्के  कु टुंबांना वारंवार हात धुण्याचे महत्त्व पटलेले दिसून येते. मात्र, पुरेसे पाणी नसल्याने वारंवार हात धुणे आणि नेहमी अंघोळ करणे शक्य होत नाही, असे सर्वेक्षणातून समोर आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 5, 2020 1:24 am

Web Title: labor colonies monthly expenses increased due to hike in water and toilet charges dd70
Next Stories
1 नुकसानीच्या अभ्यासासाठी एक कोटी ८० लाखांचा खर्च?
2 ‘बेस्ट’च्या ताफ्यात २६ विद्युत बसगाडय़ा
3 इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनकडून बेस्टचा गौरव
Just Now!
X