‘सामाजिक उत्तरदायित्व निधी‘ करोनासाठी खर्चल्याने कंपन्यांची संस्थांकडे पाठ

नमिता धुरी, लोकसत्ता

मुंबई : टाळेबंदीमुळे एका बाजूला स्वयंसेवी संस्थांच्या सामाजकार्यात अडथळे येत असताना दुसऱ्या बाजूला या संस्थांना आर्थिक फटकाही बसत आहे. या संस्थांना खासगी कं पन्यांच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीचा (सीएसआर) खूप मोठा आधार असतो. मात्र, सध्या कं पन्यांनी हा निधी करोनासाठी पंतप्रधान सहाय्यता निधीकडे वळवला आहे. शिवाय दोन महिने उद्योगधंदे बंद असल्याने कं पन्यांना आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे. परिणामी, स्वयंसेवी संस्थांना देण्यासाठी कं पन्यांकडे पैसाच शिल्लक राहिलेला नाही. निधी संकलनासाठी संस्थांतर्फे  आयोजित के ले जाणारे इतर कार्यक्रमही बंद आहेत.

दुर्धर आजाराने ग्रस्त असलेल्या लहान मुलांची इच्छा पुरवणाऱ्या ‘मेक अ विश फाऊंडेशन‘चा वार्षिक अर्थसंकल्प ६ कोटी रुपयांचा असतो. दरवर्षी कं पन्यांना आपल्या कामाविषयीचे सादरीकरण करून त्यांच्याकडून सीएसआर निधी मिळवला जातो. पण यंदा हा निधी मिळण्याबाबत साशंकता आहे. या संस्थेची देशभरात १० कार्यालये आहेत. तेथील कर्मचाऱ्यांना पगार कसा द्यायचा हा प्रश्न निर्माण झाला आहे, असे संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक भाटिया सांगतात. गरजू कु टुंबातील मुलांच्या शिक्षणासाठी कार्यरत असणाऱ्या ‘डोअरस्टेप स्कू ल‘ या संस्थेच्या १२ कोटींच्या वार्षिक अर्थसंकल्पातील ७० टक्के  निधी सीएसआरमधूनच येतो. पण सध्या कं पन्यांनी हा निधी देण्यास असमर्थता दर्शवली आहे. मुंबई-पुण्यात मिळून संस्थेचे शेकडो कर्मचारी आहेत. पगार देता आला नाही तर कर्मचाऱ्यांमध्ये कपात करावी लागेल. शिवाय वस्त्यांमध्ये चालणाऱ्या शाळांच्या जागांचे भाडे कसे देणार हाही प्रश्न आहे. टाळेबंदीत वित्तसंस्था सुरू असल्याने त्यांच्याकडून निधीची अपेक्षा असल्याचे संचालिका बिना शेख लष्करी सांगतात.वृद्धांसाठी काम करणाऱ्या ‘हेल्पएज इंडिया‘ संस्थेला दरवर्षी ८० ते ९० कोटी रुपये निधीची गरज असते. मात्र, आता देणग्यांचा ओघ कमी झाल्याने समाजमाध्यमांतून जनतेला मदतीसाठी आवाहन करणार असल्याचे संचालक प्रकाश बोरगावकर सांगतात. अठरा वर्षांवरील गतिमंद व्यक्तींना स्वावलंबी बनवण्याचे काम ‘श्रद्धा चॅरिटेबल ट्रस्ट‘ करते. इथे येऊन गतिमंद व्यक्ती कागदी पिशव्या, रांगोळी, अशा वस्तू तयार क रतात. ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये या वस्तूंचे प्रदर्शन भरवले जाते. त्यातून गतिमंद व्यक्तींना आर्थिक मोबदला मिळतो.