News Flash

भगवती रुग्णालयातील आणीबाणी टळली !

पालिकेच्या भगवती रुग्णालयात के वळ आजचाच दिवस पुरेल इतका साठा असल्याचे पालिकेच्या यंत्रणेच्या लक्षात आले.

मुंबई : बोरिवली येथील पालिके च्या भगवती रुग्णालयात प्राणवायूचा तुटवडा भासू लागल्यामुळे २० रुग्णांना हलवण्याची वेळ आली होती. मात्र पालिके ने  तत्काळ नियोजन करून प्राणवायूचा पुरवठा सुरळीत केल्याने ही आणीबाणी टळली.

आधीच देशभरात प्राणवायूचा तुटवडा असताना मुंबईला वैद्यकिय प्राणवायू पुरवठा करणाऱ्या एका कारखान्यात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे दुपारी संपूर्ण मुंबईतच आणीबाणीची स्थिती आली होती. त्यातच पालिकेच्या भगवती रुग्णालयात के वळ आजचाच दिवस पुरेल इतका साठा असल्याचे पालिके च्या यंत्रणेच्या लक्षात आले. त्यामुळे या रुग्णालयातील २० रुग्णांना दहिसर करोना उपचार केंद्रात हलवण्याची वेळ आली होती. दुपारच्या सुमारासा आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी सावधगिरीचा इशाराही जारी केला होता. पण, संध्याकाळपर्यंत सर्व पुरवठा सुरळीत झाला. मुंबईतील प्राणवायू पुरवठ्यातील सर्व अडथळे दुरु झाले आहे. प्राणवायूचा पुरवठा सुरळीत आहे,असे आयुक्त चहल यांनी रविवारी संध्याकाळी सांगितले.

प्राणवायूच्या तुटवड्यामुळे भगवती रुग्णालयातील २० कोविड रुग्णांना वांद्रे कुर्ला संकुल व दहिसर करोना उपचार केंद्रात हलवल्याची चर्चा सुरू होती. मात्र,आयुक्तांनी हे वृत्त फे टाळले असून रुग्णांना प्राणवायू अभावी हलविण्यात आलेले नसल्याचे सांगितले.

दरम्यान, १६ एप्रिलला देखील भगवती रुग्णालयात अशीच आणीबाणी आली होती. या रुग्णालयात सिलिंडरने प्राणवायूचा पुरवठा के ला जातो. हा पुरवठा के वळ दोन दिवसापुरता  होता. त्यामुळे २५ रुग्णांना दहिसर करोना उपचार केंद्रात व शताब्दी रुग्णालयात हलवण्यात आले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 26, 2021 1:59 am

Web Title: lack of oxygen in bhagwati hospital of the municipality akp 94
Next Stories
1 महिलांमध्ये प्रतिपिंडांचे प्रमाण अधिकच
2 ‘सेव्हन हिल्स’मध्ये वर्षभरात करोना यंत्रणेवर ११९ कोटी खर्च
3 अज्ञात व्यक्तीच्या मारहाणीत तीन मांजरींचा मृत्यू