News Flash

तरुणीच्या गाडीची पोलिसाला धडक

भरधाव वेगाने गाडी चालविणाऱ्या एका तरुणीने पोलीस हवालदाराला जोरदार धडक दिली. या धडकेत या पोलिसाच्या पायाला दुखापत झाली आहे. मालाडच्या काचपाडा जंक्शन येथे बुधवारी दुपारी

| February 14, 2013 04:26 am

भरधाव वेगाने गाडी चालविणाऱ्या एका तरुणीने पोलीस हवालदाराला जोरदार धडक दिली. या धडकेत या पोलिसाच्या पायाला दुखापत झाली आहे. मालाडच्या काचपाडा जंक्शन येथे बुधवारी दुपारी ही घटना घडली. खुशबू गोलाम (२७) असे वाहनचालक तरुणीचे नाव असून तिला प्रथम अटक करून नंतर जामिनावर सुटका करण्यात आली.
काचपाडा जंक्शन येथे दुपारी बांगुर नगर पोलीस ठाण्याचे कर्मचारी वाहन तपासणी करत होते. पोलीस हवालदार प्रकाश रामचंद्र बड्डी हे एक वाहन थांबवत असताना रस्त्याच्या मध्ये आले होते. त्यावेळी वेगाने आलेल्या एका आय टेन गाडीने त्यांना धडक दिली. त्यात त्यांच्या पायाला दुखापत झाली. त्यांच्यावर डायमंड रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 14, 2013 4:26 am

Web Title: lady driven car hited to police
Next Stories
1 बालिकेला चिरडले
2 महाविद्यालयातील विद्यार्थिनींची दबंगगिरी
3 सात वर्षांच्या मुलीस कोंडून ठेवल्याप्रकरणी चौघांना अटक
Just Now!
X