19 September 2020

News Flash

विरार स्टेशनवरच्या लोकलमध्येच बाळाचा जन्म

बाळ आणि त्याची सुखरूप असल्याची माहितीही समजते आहे

विरार स्टेशनवर उभ्या असलेल्या एका गरोदर महिलेने बाळाला जन्म दिला. ही महिला पालघरच्या सफाळे भागातली आहे. ट्रेन प्लॅटफॉर्मवर असतानाच या महिलेला मुलगी झाली. बाळ आणि महिलेची प्रकृती चांगली आहे अशीही माहिती कळते आहे.

आज सकाळी साडेअकराच्या सुमारास विरार रेल्वे स्थानकातल्या प्लॅटफॉर्म क्रमांक तीनवर ही घटना घडली. सोनी अजय पटेल या डहाणू लोकलच्या अपंगांच्या डब्यात बसल्या होत्या. विरार स्टेशनवर जेव्हा ट्रेन आली तेव्हाच त्यांना प्रसुतीवेदना सुरू झाल्या. रेल्वे स्थानकावरच्या आरपीएफ, जीआरपी यांना ही माहिती कळताच त्यांनी महिला पोलीस, सफाई कामगार महिला यांना तातडीने बोलावलं. त्यानंतर लोकलच्या डब्यातच सोनी पटेल यांची प्रसुती झाली. त्यांनी एका मुलीला जन्म दिला. यानंतर सोनी पटेल यांना विरार ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आलं. या दोघींची प्रकृती आता चांगली आहे असेही समजते आहे. एका मराठी वृत्तवाहिनीने हे वृत्त दिले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 6, 2019 9:07 pm

Web Title: lady gives birth to her baby in dahanu local at virar station
Next Stories
1 सोन्यातील गुंतवणुकीचे प्रमाण यंदा वाढणार, अतिउच्च संपत्तीधारकांची संख्या अधिक
2 जेटला न्याय द्या, अन्यथा मुंबईतून विमानांचं उड्डाण विसरा!
3 Mumbai Coastal Road : सुप्रीम कोर्टाचा बीएमसीला हिरवा कंदील
Just Now!
X