25 February 2021

News Flash

महिला पोलिसाची पतीकडून हत्या

महिला पोलीस शिपाई संध्या नांदिवडेकर-पाटील (४३) यांची त्यांच्या पतीनेच गळा चिरून हत्या केल्याचे उघड झाले आहे.

| July 31, 2015 12:01 pm

महिला पोलीस शिपाई संध्या नांदिवडेकर-पाटील (४३) यांची त्यांच्या पतीनेच गळा चिरून हत्या केल्याचे उघड झाले आहे. बुधवारी रात्री पोलीस फोर्ट येथील वसाहतीमधील राहत्या घरात त्यांचा मृतदेह आढळून आला होता. या प्रकरणी आझाद मैदान पोलिसांनी पाटील यांच्या पतीला अटक केली आहे.
संध्या नांदिवडेकर-पाटील या विशेष शाखेत कार्यरत होत्या. पोलीस आयुक्ताशेजारी असलेल्या पोलीस वसाहतीमधील बी क्रमांकाच्या इमारतीत त्या रहात होत्या. बुधवारी रात्री राहत्या घरात त्यांचा मृतदेह आढळून आला होता. त्यांचा गळा चिरलेला होता. सुरवातीला त्यांनी आत्महत्या केली असावी अशी शक्यता वर्तवली जात होती. परंतु तपासानंतर त्यांच्या पतीचा सहभाग उघड झाला. या घटनेनंतर फरार झालेल्या त्यांच्या पतीला पोलिसांनी अटक केली. या दाम्पत्यात कौटुंबिक वाद होता. बुधवारी झालेल्या भांडणानंतर त्याने स्वंयपाकघरातील चाकूने संध्या पाटील यांची गळा चिरून हत्या केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 31, 2015 12:01 pm

Web Title: lady police killed by her husband
टॅग : Husband
Next Stories
1 ‘रुस्तमजी डेव्हलपर्स’ला एमआरटीपी नोटीस
2 सत्तेत आल्यापासून राज्यातील गुन्हेगारी घटली- मुख्यमंत्र्यांचा दावा
3 मुंबई-नागपूर सहापदरी महामार्ग बांधणार, फडणवीसांची महत्त्वपूर्ण घोषणा
Just Now!
X