नवरात्रोत्सवानिमित्त ‘लोकसत्ता’चा उपक्रम
स्वशक्तीची ओळख असलेली आजची स्त्री एकाच वेळी अनेक पातळ्यांवर आघाडी घेत आहे. विविध व्यवधाने सांभाळत संसार, नोकरी वा करिअर करत ती समाजाला पुढे नेण्यासाठी, समाजाला घडवण्यासाठीही नवनवीन आव्हाने पेलत आहे. ‘लोकसत्ता’ शोध घेत आहे समाजातल्या अशाच काही नवदुर्गाचा, ज्यांनी स्वत:ला घडवत समाजातही बदल घडवले आहेत, नवीन पायंडे घालून दिले आहेत. नवरात्रोत्सवात यंदाही ‘शोध नवदुर्गेचा’ हा उपक्रम राबविण्यात येणार असून ‘अभ्युदय बँक’ या कार्यक्रमाचे प्रायोजक आहे.
जिने समाजात विधायक बदल घडवले आहेत किंवा आव्हानांना तोंड देत, प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत स्वत:चे सामथ्र्य सिद्ध केले, अशा दुर्गेची माहिती तुम्ही पाठवू शकता. असे कार्य केले असल्यास, तुम्ही तुमची स्वत:ची माहितीही पाठवू शकता. ही माहिती तुम्ही ई-मेलद्वारे किंवा आमच्या कार्यालयीन पत्त्यावर फोटोसह पाठवू शकता. मात्र २० सप्टेंबपर्यंत ती आम्हाला मिळणे आवश्यक आहे.

‘शोध नवदुर्गेचा’ या उपक्रमासाठी नऊ दुर्गाच निवडायच्या असल्याने अंतिम निर्णय परीक्षकांचाच राहील. आमचा पत्ता- लोकसत्ता शोध नवदुर्गेचा, ईएल १३८, टीटीसी इंडस्ट्रियल इस्टेट, महापे, नवी मुंबई ४०० ७१० किंवा oksattanavdurga@gmail.com