News Flash

मोटारसायकलीने तरुणीचे मनगट तोडले

मोटारसायकलीने दिलेल्या धडकेत एका महाविद्यालयीन तरुणीला आपले मनगट गमवावे लागले आहे. बुधवारी दुपारी बोरिवलीच्या मागाठणे येथे ही घटना घडली. नायर रुग्णालयात या तरुणीवर उपचार सुरू

| February 14, 2013 04:27 am

मोटारसायकलीने दिलेल्या धडकेत एका महाविद्यालयीन तरुणीला आपले मनगट गमवावे लागले आहे. बुधवारी दुपारी बोरिवलीच्या मागाठणे येथे ही घटना घडली. नायर रुग्णालयात या तरुणीवर उपचार सुरू असून फरार मोटारसायकलस्वाराचा पोलीस शोध घेत आहेत.
 बोरीवली पूर्वेच्या जय महाराष्ट्र नगर येथे राहणारी श्रद्घा तरे (२०) ही तरुणी शैलेंद्र एज्युकेशन महाविद्यालयात प्रथम वर्ष वाणिज्य शाखेत शिकते. बुधवारी दुपारी ती नेहमीप्रमाणे बसमधून घरी परतत होती. मागाठणे येथे बसमधून उतरून घरी जात असताना मागून आलेल्या पल्सर मोटारसायकलीने तिला धडक दिली. त्यात ती खाली पडली आणि तिचा हात मोटारसायकलीच्या मागील चाकात अडकला.
रक्तबंबाळ अवस्थेत ती व्हिवळत असताना मोटारसायकलस्वार तिला मदत न करता पळून गेला. एका प्रत्यक्षदर्शीने त्याला पकडण्याचा प्रयत्नही केला. या अपघातात श्रद्धाचे मनगट तुटले. तिला आधी भगवती रुग्णालयात आणि नंतर नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिचे मनगट जोडण्याचा प्रयत्न सुरू आहे. हा मोटारसायकलस्वार चुकीच्या दिशेने आणि भरधाव वेगाने जात असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 14, 2013 4:27 am

Web Title: lady wrist cut off by motorcycle
टॅग : Motorcycle
Next Stories
1 तरुणीच्या गाडीची पोलिसाला धडक
2 बालिकेला चिरडले
3 महाविद्यालयातील विद्यार्थिनींची दबंगगिरी
Just Now!
X