अवघ्या मुंबईकरांचे श्रध्दास्थान असणा-या लालबागच्या राजाची पाऊल पूजा मंगळवारी पार पडली. गणेशोत्सवाच्या जवळपास दोन महिने आधी पावलांची पूजा केल्यानंतर याच पावलांची माती गणपतीची मूर्ती तयार करण्यासाठी वापरली जाते. या पूजेनंतर लालबाग गणेशोत्सव मंडळ खर्‍या अर्थाने तयारीला लागते. आणि मुंबईकरांनाही गणेशोत्सवाचे वेध लागू लागतात. लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यंदा ८१ वे वर्ष साजरं करत आहे.