24 January 2020

News Flash

‘लालबागचा राजा’ मंडळाला मिळणाऱ्या सोन्या-चांदीच्या दागिन्यांमध्ये व देणगीमध्ये घट

यंदाच्या गणेशोत्सवावर मंदीचा परिणाम दिसून आला असून लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाच्या देणगीमध्ये घट झाली आहे.

यंदाच्या गणेशोत्सवावर मंदीचा परिणाम दिसून आला असून लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाच्या देणगीमध्ये घट झाली आहे. लालबागचा राजा हे मुंबईतील प्रसिद्ध गणेशोत्सव मंडळ आहे. मागच्यावर्षी रोख रक्कमेच्या स्वरुपात मंडळाकडे ६.५५ कोटी रुपये जमा झाले होते. यंदा हा आकडा ५.०५ कोटी रुपये आहे अशी माहिती मंडळाचे मानद सचिव सुधीर साळवी यांनी दिली. मुंबई मिररने हे वृत्त दिले आहे.

२०१८ मध्ये गणेश भक्तांनी लालबागच्या राजाला पाच किलो सोने आणि ८० किलो चांदी अर्पण केली होती. यंदा भाविकांनी ३.७५ किलो सोने ५६.७ किलो चांदी अर्पण केली. यंदाच्या वर्षी लालबागच्या राजाला अर्पण करण्यात आलेल्या विविध वस्तूंचा लिलाव करुन मंडळाला आतापर्यंत १.२५ कोटी रुपये मिळाले आहेत. मागच्यावर्षी लिलावातून १.०९ कोटी रुपये जमा झाले होते. दरवर्षी गणेशभक्त मोठया प्रमाणात लालबागच्या राजाला रोख रक्कम व सोने-चांदी अर्पण करतात. पण यंदा मंदी आणि पावसाचा फटका बसल्याचे सुधीर साळवी यांनी सांगितले.

लाडू विक्रीचा हवाला देऊन यंदा गणेश भक्तांची संख्या वाढल्याचा दावा त्यांनी केला. गेल्यावर्षी आम्ही १.६२ लाख लाडू विकले होते. यंदा १.८६ लाख लाडूंची विक्री झाली. यावरुन भक्तांची संख्या वाढल्याचे स्पष्ट होते असे साळवी म्हणाले. मंदीमुळे मंडळाला मिळणाऱ्या देणगीवर परिणाम झाला असे त्यांचे म्हणणे आहे. लालबागच्या राजाला अर्पण करण्यात आलेल्या सोन्या-चांदीच्या दागिन्यांमध्ये सोन्याची थाळी यंदाच्या वर्षीची सर्वात महागडी वस्तू आहे. थाळीसोबत दोन वाटया आणि एक चमचा आहे. ५० लाखाच्या घरात या सोन्याच्या थाळीची किंमत आहे. यंदा गणेशोत्सवात मुंबईत मोठया प्रमाणावर पाऊस झाला. रस्ते आणि रेल्वे वाहतुकीचा बोजवारा उडाला होता.

First Published on September 17, 2019 1:52 pm

Web Title: lalbaugcha raja receive less donation gold dmp 82
Next Stories
1 बाळासाहेब ठाकरे कला दालनाचा वाद : मीरा-भाईंदर महापालिकेत शिवसेनेचा राडा
2 “तुमच्या रथावर स्वार झालेले अमोल कोल्हे हे शिवसेनेचंच पार्सल”
3 पवारसाहेब, स्वाभिमान म्हणजे नक्की काय? : शिवसेना
Just Now!
X