News Flash

लालूप्रसाद रुग्णालयात; हृदयावर शस्त्रक्रिया ?

बिहारमध्ये लालूप्रसाद यादव यांच्या पक्षाने पोटनिवडणुकीत बाजी मारली असली तरी हा आनंद त्यांना साजरा करता आला नाही. कारण प्रकृती ठिक नसल्याने लालूप्रसाद यांना एशियन हार्ट

| August 26, 2014 12:04 pm

बिहारमध्ये लालूप्रसाद यादव यांच्या पक्षाने पोटनिवडणुकीत बाजी मारली असली तरी हा आनंद त्यांना साजरा करता आला नाही. कारण प्रकृती ठिक नसल्याने लालूप्रसाद यांना एशियन हार्ट रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. २४ तास त्यांना रुग्णालयात तपासणीसाठी ठेवण्यात येणार असल्याचे रुग्णालयाच्या प्रवक्त्यांनी सांगितले.  लालूप्रसाद यांच्या हृदयातील एक झडप छोटी झाली असून, येत्या एक-दोन दिवसांत त्यांच्या हृदयावर शस्त्रक्रिया करावी लागणार आहे. प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. रमाकांत पांडा यांच्या देखरेखीखाली यादव यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत. प्रकृती चांगली नसल्याने यादव पत्नी राबडीदेवी यांच्यासह मुंबईत दाखल झाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ, प्रवक्ते नवाब मलिक यांनी रुग्णालयात जाऊन प्रकृतीची चौकशी केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 26, 2014 12:04 pm

Web Title: lalu prasad admitted in hospital may undergo heart surgery
टॅग : Lalu Prasad
Next Stories
1 अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार
2 कांदिवली रेल्वे स्थानकात रिक्षा!
3 संक्षिप्त :महावितरणमध्ये महाभरती
Just Now!
X