कौशल्य विकास, संगीत विद्यापीठासाठी जागेची मागणी 

मुंबई : मुंबई विद्यापीठातील विविध विभागांचा विस्तार आणि नव्या प्रकल्पांसाठी विद्यापीठाकडील जमीन अपुरी पडण्याची शक्यता असताना आता कलिना विद्यानगरी संकुल परिसरात उच्चशिक्षण विभागाने कौशल्य विकास विद्यापीठ आणि मास्टर दीनानाथ मंगेशकर संगीत विद्यापीठासाठी जागेची मागणी केल्याचे समजते. उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनीही या वृत्तास दुजोरा दिला आहे.

मुंबई विद्यापीठाचे कलिना येथील संकुल साधारण २४३ एकर परिसरात पसरले आहे. विविध विभाग, मैदान, क्रीडा संकुल, औषधी वनस्पतींचे उद्यान असलेल्या या संकुलाची जागा भविष्यात विद्यापीठाला अपुरी पडण्याची चर्चा सतत सुरू असते. मुंबई महानगर विकास प्राधिकरणाला विद्यापीठाच्या या परिसरातील साधारण साडेआठ एकर जमीन देण्यात आली. त्याचबरोबर आता कौशल्य विकास विभागाने साधारण १५ एकर जमिनीची मागणी विद्यापीठाकडे केल्याचे समजते. त्याचबरोबर राज्यात मास्टर दीनानाथ मंगेशकर संगीत विद्यापीठ उभारण्याचाही प्रस्ताव आहे. त्याचबरोबर दादासाहेब फाळके कला -चित्रपट महाविद्यालयही प्रस्तावित आहे. त्यासाठी साधारण १० एकर जागेची मागणी करण्यात आली आहे. याबाबत विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने राज्यपालांना पत्र लिहून त्यांचे मार्गदर्शन मागितले आहे.

mumbai university , law students
पुनर्मूल्यांकन अर्जांचा गोंधळ: मुंबई विद्यापीठाच्या विधि शाखेच्या नवव्या सत्राचे विद्यार्थी संभ्रमात
Suicide student
जळगावात परिचारिका महाविद्यालयातील विद्यार्थिनीची आत्महत्या
Nursing student commits suicide in hostel
नागपूर : धक्कादायक! नर्सिंगच्या विद्यार्थिनीची वसतिगृहातच आत्महत्या
Suicide attempt of college girl due to harassment incident in Bharti University campus
छेडछाडीमुळे महाविद्यालयीन युवतीचा आत्महत्येचा प्रयत्न, भारती विद्यापीठ परिसरातील घटना

विद्यापीठाच्या विकासाचे काय?

विद्यापीठात अनेक प्रकल्प राबवले जाणार आहेत. वसतीगृहे, नवे विभाग यांसाठी नव्या इमारती आणि जागेची गरजही वाढते आहे. ‘एमएमआरडीए’ला जागा देताना विद्यापीठाचा विकास आराखडा करणे अपेक्षित होते. मात्र, ते अद्याप मार्गी लागलेले नाही. असे असताना विद्यापीठातील जमीन इतर विद्यापीठांना देणे अडचणीचे ठरू शकते, असे मत विद्यापीठातील अधिकार मंडळाच्या सदस्यांनी व्यक्त केले.

कौशल्य विकास विभागाने काही जमीन मागितली आहे. नव्या संस्थांनीही जमिनीची मागणी केली आहे. मात्र, त्याबाबत अद्याप काहीही निर्णय घेतलेला नाही किंवा चर्चा झालेली नाही.

      – उदय सामंत, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री