‘लोकसत्ता वास्तुरंग वास्तुलाभ’ योजनेचा उद्या शेवटचा दिवस
‘लोकसत्ता वास्तुरंग वास्तुलाभ’ योजनेला ग्राहकांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे. ‘एका घरावर दुसरे नवे कोरे घर’ आपल्या नावे करून घेण्यासाठी ग्राहकांकडून प्रचंड गर्दी केली जात आहे. दहा बाय दहा का असेना पण स्वत:च्या मालकीचे घर असावे, असे स्वप्न रात्रंदिवस पाहणाऱ्यासाठी ‘लोकसत्ता वास्तुरंग वास्तुलाभ’ ही योजना आणली आहे. या योजनेचा उद्याचा शेवटचा दिवस असल्याने ग्राहकांसाठी ही शेवटची संधी असणार आहे. एवढेच नव्हे तर एसी, फ्रिज अशा एकाहून एक आकर्षक बक्षिसांसह परदेशी सहलही ग्राहकांना बक्षीस स्वरूपात मिळणार आहे.
वास्तुलाभ योजनेसाठी तुलसी इस्टेट हे टायटल पार्टनर, मोहन ग्रुप हे असोसिएट पार्टनर आणि केसरी हे ट्रॅव्हल पार्टनर आहेत. स्पर्धेच्या नियम व अटींसाठी लोकसत्ताच्या संकेतस्थळाला भेट द्या. आपल्याला हवे तसे मनासारखे घर प्रत्यक्षात मिळवताना अनेकांना महिनोन्महिने अनेक ठिकाणी फिरावे लागते. ग्राहकांचा हाच त्रास दूर करण्यासाठी आणि त्यांना एका घराच्या किमतीत दोन घरे मिळावीत यासाठी मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पनवेल आदी परिसरात आटोपशीर घरांपासून आलिशान घरांपर्यंत सर्व प्रकारचे पर्याय ‘लोकसत्ता वास्तुरंग वास्तुलाभ’ योजनेत उपलब्ध करण्यात आले आहेत. या योजनेत सहभागी झालेल्या ग्राहकांनी बांधकाम व्यावसायिकांकडे उद्यापर्यंत घरखरेदी करताना मिळालेला अर्ज भरून जमा करावयाचा आहे.
त्यानंतर काढलेल्या सोडतीत भाग्यवंतांना खरेदी केलेल्या घरासोबतच आणखी एक नवे कोरे घर जिंकण्याची संधी मिळेल. यासोबत परदेश सहल तसेच इतर अनेक आकर्षक बक्षिसेही मिळणार आहेत. या योजनेत सहभागी झालेल्या बांधकाम व्यावसायिकांची नावे व दूरध्वनी क्रमांकाची माहिती ‘लोकसत्ता वास्तुरंग वास्तुलाभ’ मध्ये दिली जाणार आहे.