18 September 2020

News Flash

टाइपरायटरवर टंकलेखनाची आज शेवटची परीक्षा 

हजारो संस्थांमधील प्रशिक्षक-प्रशिक्षणार्थी कालबाह्य़

| August 12, 2017 01:15 am

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

यापुढील सर्व परीक्षा संगणकावरच; हजारो संस्थांमधील प्रशिक्षक-प्रशिक्षणार्थी कालबाह्य़

टाइपरायटरचा वापर करून घेतली जाणारी टंकलेखनाची अखेरची परीक्षा आज होत असून यापुढील काळात सरकारी कार्यालयात दिसणारे टाइपरायटर पूर्णपणे कालबाह्य़ होत आहेत. टाइपरायटरचे प्रमाण आज काही प्रमाणावर शिल्लक असले तरी यापुढे ते काळाच्या पडद्याआड जाणार आहेत. टंकलेखन प्रशिक्षण संस्थांनी टाइपरायटरवर टंकलेखनाची परीक्षा सुरू ठेवावी, अशी मागणी करीत विद्यार्थ्यांना त्यासाठी प्रवेश देणे सुरूच ठेवले होते.

शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने काढलेल्या जीआरनुसार सरकारी कार्यालयात आता ई-प्रशासनाला महत्त्व असल्याने संगणक प्रशिक्षण महत्त्वाचे आहे. पण टंकलेखन संस्थांनी टंकलेखनाची परीक्षा टाइपरायटरवर घेण्याची मागणी काही वर्षे रेटून नेली. आता टाइपरायटर बंद होत असल्याने ३५०० खासगी टंकलेखन प्रशिक्षण संस्थांना फटका बसणार आहे, असे बॉम्बे कॉमर्स एज्युकेशनल इन्स्टिटय़ूट असोसिएशनचे अध्यक्ष प्रभाकर डंबाल यांनी सांगितले. टाइपरायटर वापरणे बंद करण्याला आमचा आक्षेप नाही, पण या निर्णयाने ३५०० संस्थांतील १० हजार प्रशिक्षक बेकार होणार आहेत. टाइपरायटरचा वापर टप्प्याटप्प्याने कमी करायला हवा होता पण त्यात घाई केली जात आहे, असे लघुलेखन व टंकलेखन संस्थेचे अशोक अभ्यंकर यांनी सांगितले. डिजिटल इंडियाच्या युगात टंकलेखन यंत्रे वापरणे प्रगतीचे लक्षण नाही त्यामुळे टंकलेखन यंत्रे बाद केली जात आहेत. ई-प्रशासनात संगणक टंकलेखनाला महत्त्व आहे. तीच व्यावसायिक गरज आहे त्यामुळे आमचा निर्णय योग्यच आहे असे सुखदेव डेरे यांनी सांगितले.

अखेरची चाचणी

२०१३ मध्ये सरकारी ठरावानुसार टाइपरायटर टप्प्याटप्प्याने काढून टाकण्याचे ठरवण्यात आले होते. त्यामुळे नंतर टंकलेखनाची परीक्षा संगणकावरच घेतली जात होती, पण टंकलेखन यंत्रांचा पर्यायही ठेवला होता. पण आता १२ ऑगस्टला टंकलेखन यंत्राच्या माध्यमातून अखेरची परीक्षा होत आहे, असे महाराष्ट्र राज्य परीक्षा मंडळाचे आयुक्त सुखदेव डेरे यांनी सांगितले. १८ ऑगस्टपासून सर्व परीक्षा संगणकावरच घेतल्या जाणार आहेत त्यामुळे टाइपरायटर म्हणजे टंकलेखनाचा वापर आता यापुढे होणार नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 12, 2017 1:14 am

Web Title: last test for typing on typewriters
Next Stories
1 एअर इंडियाच्या ग्वाल्हेरला जाणाऱ्या विमानात अपंग तरुणीला मज्जाव
2 प्रकाश मेहता आणि सुभाष देसाईंची लोकायुक्तांमार्फत चौकशी; मुख्यमंत्र्यांची घोषणा
3 खचलेल्या रस्त्यामुळे दोन तरुणांचा बळी?
Just Now!
X