25 February 2021

News Flash

लतादीदींकडून जवानांना एक कोटींची मदत जाहीर

सैन्याबद्दल असलेल्या कृतज्ञेतून ही मदत करत असल्याचं लतादीदींनी म्हटलं आहे

संग्रहित छायाचित्र

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी जवानांना एक कोटी पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधत ही मदत लष्कराच्या स्वाधीन केली जाईल. जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी.. असं आवाहन लोकांना त्यांच्या गाण्यातून करणाऱ्या लतादीदींनी सामाजिक भान जपत जवानांना 1 कोटी पाच लाखांची मदत जाहीर केली आहे. सोमवारी यासंदर्भातली घोषणा करण्यात आली.

14 फेब्रुवारी या दिवशी जम्मू काश्मीरच्या पुलवामा भागात दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात चाळीस जवान शहीद झाले. या घटनेनंतर देशभरात संताप उसळला आहे. पाकिस्तानचा बदला घ्या अशी मागणी होते आहे. तर सीमेवर डोळ्यात तेल घालून उभ्या असलेल्या जवानांबाबत देश कृतज्ञताही व्यक्त करताना दिसतो आहे. तसेच जे जवान शहीद झाले त्याबद्दल हळहळही व्यक्त करण्यात आली. आपल्या परीने प्रत्येक जण काही ना काही मदत करताना दिसतो आहे. आता लष्करासाठी कृतज्ञता व्यक्त करण्याच्या भावनेतून गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी वैयक्तिक स्तरावर 1 कोटी रुपये आणि दीनानाथ मंगेशकर प्रतिष्ठानतर्फे पाच लाखांची मदत जाहीर केली आहे. ‘एबीपी माझा’ने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

पूर्वी माझ्या वाढदिवसाच्या दिवशी मी एकदा आवाहन केले होते की वाढदिवस असताना तुम्ही मला फुलं, शुभेच्छापत्रं, भेटवस्तू पाठवता ते न पाठवता जवानांसाठी पैसे गोळा करा आणि ते जवानांना पाठवा. माझ्या या आवाहनाला त्यावेळी लोकांनी भरभरून प्रतिसाद दिला होता. आता या वेळीही मी असेच आवाहन करते आहे असंही लता मंगेशकर यांनी म्हटलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 26, 2019 1:41 am

Web Title: lata mangeshkar announce to donate 1 crore rupees to jawans of india
Next Stories
1 ब्रह्मकुमारी शिवानी यांचे विधिमंडळात प्रवचन!
2 कामाला लागा, आपणच जिंकणार..
3 ‘वक्ता दशसहस्रेषु’ची प्राथमिक फेरी आजपासून
Just Now!
X